वणी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

वणी, अनिल गांगुर्डे- वणी शहरात पिंपळगांव रस्ता ते शाहु महाराज चौका पर्यंत तसेच शहरातील अनेक भागात बेशिस्त पार्किंग व दुकानदारांनी रस्त्यावर दुकाना समोर मांडलेले साहित्याच्या अतिक्रमणा मुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुक कोंडी होत आहे. शहरातील सुज्ञ व प्रतिष्ठित व्यापारी पदाधिकारीच रस्त्यावर बाजार मांडून बसले असल्याने अडचणीचे झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासन किंवा वणी पोलिस याकडे दुर्लक्ष …

‘ब्लॅक स्पॉट’मुक्तीला आचारसंहितेचा ब्रेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अतिक्रमण निर्मूलन आणि नगररचना विभागातील टोलवाटोलवी अखेर महापालिकेला भोवली असून, शहरातील मुख्य रस्त्यांवरील ‘ब्लॅक स्पॉट’मुक्तीची कारवाई लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे. पंचवटीतील हॉटेल मिरचीलगतच्या चौकातील बस दुर्घटनेला आता दीड वर्षाचा कालावधी उलटला, तरी ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमणे ‘जैसे थे’ राहिली आहेत. छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील हॉटेल मिरचीलगतच्या चौकात दि. ८ ऑक्टोबर …

The post ‘ब्लॅक स्पॉट’मुक्तीला आचारसंहितेचा ब्रेक appeared first on पुढारी.

नाशिक : अनधिकृत बांधकामांवर मंगळवारपासून हातोडा

नाशिक: पुढारी वृत्तसेवा शहरातील वाढती अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांविषयी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर अतिक्रमण नूिर्मलन विभाग अॅक्शन मोडवर आला असून येत्या मंगळवार, दि. ५ सप्टेंबरपासून शहरातील दोनशेहून अधिक अनधिकृत बांधकामांवर टप्प्याटप्प्याने हातोडा मारला जाणार आहे. अतिक्रमण निमूर्लन विभागासह बांधकाम, नगररचना विभागांमार्फत संयुक्तरित्या ही कारवाई केली जाणार असून यासाठी पोलिस बंदोबस्तही मागविण्यात …

The post नाशिक : अनधिकृत बांधकामांवर मंगळवारपासून हातोडा appeared first on पुढारी.

नाशिक : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनरक्षक महिलेसह वन मजुराला मारहाण

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा वनविभागाच्या राखीव जमिनीवरील अनधिकृत झोपड्या काढण्यासाठी गेलेल्या महिला वनरक्षकासह वनमजुराला आठ ते दहा जणांनी दमदाटी शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारात रविवारी (दि. 23) सकाळी अकरा ते साडे अकराच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनरक्षक वत्सला तुकाराम कांगणे व वनमजूर मधुकर शिंदे अशी …

The post नाशिक : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनरक्षक महिलेसह वन मजुराला मारहाण appeared first on पुढारी.

नाशिक : तर मनपा आयुक्तांना काळे फासणार; राष्ट्रवादीचे मनपा मुख्यालयात निदर्शने

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मुकुंदवाडीत क्रीडांगणासह इतर विकासकामांसाठी दीड कोटीचा निधी मंजूर असूनही केवळ अतिक्रमणामुळे हे काम रखडले आहे. हे अतिक्रमण हटविण्यात मनपा प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने मनपा मुख्यालयात निदर्शने केलीत. महानगराध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी आयुक्त भालचंद्र गोसावी यांना काळे फासण्याची तयारी केली होती, परंतु ते अनुपस्थित असल्याने …

The post नाशिक : तर मनपा आयुक्तांना काळे फासणार; राष्ट्रवादीचे मनपा मुख्यालयात निदर्शने appeared first on पुढारी.

नाशिक मनपाकडून १२५ दुकानदारांना नोटिसा; २४ तासांचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराची मुख्य बाजारपेठ अन् वर्दळीचे ठिकाण असलेल्या एमजीरोड, शिवाजी रोड, मेनरोड तसेच दहीपूल भागांतील तब्बल १२५ दुकानदारांना त्यांच्या आस्थापनांसमोरील अतिक्रमणे २४ तासांत काढावीत, अशा आशयाच्या नोटिसा महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयाच्या जाहिरात व परवाने विभागाने बजावल्या आहेत. अतिक्रमणे न काढल्यास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही नोटिसींच्या माध्यमातून देण्यात आला …

The post नाशिक मनपाकडून १२५ दुकानदारांना नोटिसा; २४ तासांचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

नाशिक : शालिमारला विक्रेत्यांकडून पुन्हा अनधिकृतपणे दुकानांची उभारणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयाने चार मेरोजी धडक कारवाईत बुलडोझरच्या सहाय्याने शालिमारला महाकवी कालिदास कलामंदिरासमोरील कब्रस्तानला लागून असलेल्या भूखंडावर जमीनदोस्त केलेल्या अनधिकृत २४ पत्र्याच्या दुकानांच्या जागेवर कारवाईच्या पाचव्याच दिवशी पुन्हा पत्र्याचे शेड उभारले जात आहेत. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केले जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गेल्या २६ वर्षांपासून या भूखंडावर अनाधिकृतपणे …

The post नाशिक : शालिमारला विक्रेत्यांकडून पुन्हा अनधिकृतपणे दुकानांची उभारणी appeared first on पुढारी.

नाशिक : अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा पडणार मनपाचा हातोडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील अनधिकृत सर्वधर्मिय धार्मिकस्थळ हटविण्याची मोहीम पुन्हा एकदा हाती घेतली जाणार आहे. २०१९ मध्ये महापालिकेने सर्वेक्षण करीत तब्बल ६४७ अनधिकृत धार्मिकस्थळांची यादी केली होती. त्यातील २४२ धार्मिकस्थळे नियमित केली होती, तर उर्वरित धार्मिक स्थळांबाबत हरकती, सूचना मागवून कारवाई केली होती. त्यावेळी हा वाद चांगलाच पेटला होता. काहींनी …

The post नाशिक : अनधिकृत धार्मिक स्थळांवर पुन्हा पडणार मनपाचा हातोडा appeared first on पुढारी.

नाशिक : वनजमिनीवर सौर ऊर्जा कंपनीचे अतिक्रमण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वनजमिनीच्या परस्पर खरेदी-विक्रीमुळे चर्चेत आलेल्या नांदगाव तालुक्यात वनजमिनीवर सौर ऊर्जा कंपनीने अतिक्रमण केल्याची धक्कादायक बाब वणी दक्षता पथकाने उजेडात आणली. तळवाडे नियतक्षेत्रात वनजमिनीवर अतिक्रमण करून अवैध उत्खनन करणारा जेसीबी व ट्रॅक्टर दक्षता पथकाने जप्त केला. या प्रकरणी संशयित प्रकाश बाबूराव भावसार याच्याविरोधात वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदगाव वनपरिक्षेत्रातील तळवाडे …

The post नाशिक : वनजमिनीवर सौर ऊर्जा कंपनीचे अतिक्रमण appeared first on पुढारी.

नाशिक : अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण झाल्यास अधिकारी राहणार जबाबदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात कोठेही अतिक्रमण होणार नाही तसेच अधिकार्‍यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम झाल्यास त्याला संबंधित अधिकारी तसेच विभागीय अधिकारी जबाबदार असतील, अशा स्वरूपाचा इशाराच आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत दिला आहे. Ram Charan : रेड कार्पेटवर आम्ही गेलो, ऑस्कर मिळवला याचा अभिमान शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे …

The post नाशिक : अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण झाल्यास अधिकारी राहणार जबाबदार appeared first on पुढारी.