जळगावात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर १८ गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश
जळगाव : पुढारी वृत्तसेवा गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनातर्फे उपाययोजना केल्या जात आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या १८ गुन्हेगारांना शहरातून हद्दपारीचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी महेश सुधळकर यांनी काढले आहेत. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्याला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहे. जळगाव शहरात शुक्रवार दि. ९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन कार्यक्रम …
The post जळगावात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर १८ गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेश appeared first on पुढारी.
नाशिक : पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप
नाशिक : पुढारी वृत्तसेवा पाच दिवसांच्या गणरायला गणेशभक्तांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी मनपा प्रशासनाने चोख नियोजन केले होते. यावेळी गणेशभक्तांनी प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन न करता, त्या मनपा कर्मचार्यांकडे दान केल्या. यावेळी मनपा प्रशासनाने विविध ठिकाणी विसर्जन केंद्रे उपलब्ध करून …
The post नाशिक : पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप appeared first on पुढारी.
जळगाव : धानोऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत वादंग; दगडफेकीमुळे पोलिसांचा लाठीमार
जळगाव: चोपडा तालुक्यातील धानोरा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाजंत्री बंद करण्यावरुन रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उफाळलेल्या वादातून पोलिसांना लाठीमार करावा लागला. यानंतर झालेल्या दगडफेकीत दोन वाहनांच्या काचा फुटल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. धानोरा येथे आठ गणेश मंडळे आहेत. पाचवा दिवस असल्याने तीन गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका लवकर पुढे सरकल्या. त्याचवेळी सपोनि किरण दांडगे …
The post जळगाव : धानोऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत वादंग; दगडफेकीमुळे पोलिसांचा लाठीमार appeared first on पुढारी.
नाशिक : गणेशोत्सवात दारू, जुगार, बीभत्सपणाला थारा नको: अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे
नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून गुलालमुक्त गणेश विसर्जन मिरवणुकीची परंपरा जोपासली गेली आहे. यावर्षीपासून ही मिरवणूक मद्यपानमुक्त करू म्हणजे महिलांनादेखील या मिरवणुकीचा आनंद घेता येईल, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी केले. Stock Market Crash |’ब्लडबाथ’! सेन्सेक्सची दाणादाण, अवघ्या काही मिनिटांत ४ लाख कोटींचा चुराडा सिन्नर पोलिस ठाणे …
The post नाशिक : गणेशोत्सवात दारू, जुगार, बीभत्सपणाला थारा नको: अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे appeared first on पुढारी.
नाशिकमध्ये यंदा नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जनास प्रतिबंध
नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि त्यावरील रासायनिक रंगांमुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत असल्याने ते रोखण्यासाठी यंदा गणेशोत्सवात गणेशमूर्तींचे थेट नदीपात्रामध्ये विसर्जन करण्यास प्रतिबंध घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि पारंपरिक विसर्जन स्थळांची यादी मनपाकडून जाहीर करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली …
The post नाशिकमध्ये यंदा नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जनास प्रतिबंध appeared first on पुढारी.