नाशिक : दुचाकी घसरून वृद्ध ठार

नाशिक : दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ६५ वर्षीय वृद्ध ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.३१) सायंकाळी घडली. शिवाजी जगदिश बोरसे (६५, रा. जाधव संकुल, सातपूर) असे या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे. शिवाजी बोरसे हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना सायंकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून पडले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी …

The post नाशिक : दुचाकी घसरून वृद्ध ठार appeared first on पुढारी.

नाशिक : प्रेयसीसाठी प्रियकर बनला दुचाकी चोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रेयसीसोबत फिरण्यासाठी व मौजमजा करण्यासाठी एकाने दुचाकी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्यात संशयिताच्या अल्पवयीन प्रेयसीनेही साथ दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. विराज प्रदीप काळे (रा. उपनगर) असे या संशयिताचे नाव असून, त्यास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काठे गल्ली परिसरातून जुलै महिन्यात दुचाकी …

The post नाशिक : प्रेयसीसाठी प्रियकर बनला दुचाकी चोर appeared first on पुढारी.