नाशिक मनपा सर्व्हर डाऊन : क्लाऊड सर्व्हिसेसचे कामकाजही ठप्प
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नागरिकांना घरबसल्या विविध ऑनलाइन सेवा-सुविधांचा लाभ देण्यासाठी तब्बल पाऊण कोटी रुपये मोजून सुरू केलेल्या क्लाऊड सर्व्हिसेसचे कामकाज गेल्या तीन दिवसांपासून ठप्प झाल्याने घरपट्टी, पाणीपट्टी, नगररचना शुल्कासह महापालिकेच्या अन्य महत्त्वाच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत. दरम्यान, नवीन सर्व्हरवर क्लाऊड डाटा ट्रान्सफरचे काम सुरू असून मंगळवार (दि.७) सकाळपर्यंत ऑनलाइन सेवा सुरळीत होतील, असे महापालिकेच्या …