नाशिकमध्ये मोदी, पवार, ठाकरेंच्या तोफा बुधवारी धडाडणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक-दिंडोरी मतदारसंघासाठी येणारा बुधवार (दि. १५) प्रचारयुद्धाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या तिन्ही दिग्गजांच्या प्रचारतोफा बुधवारी एकाच दिवशी धडाडणार आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील वातावरण खऱ्या अर्थाने निवडणूकमय होणार आहे. नाशिक, दिंडोरी आणि धुळे …

भारतीय जनता पार्टी हीच खऱ्या अर्थाने पाकिस्तान धार्जिणी : पटोले

धुळे : पुढारी वृत्तसेवा- भारतीय जनता पार्टीचा 400 पारचा नारा मागे पडला असून आता त्यांना पाकिस्तानची आठवण का येते आहे, तुम्ही आमंत्रित नसताना पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली. यावरून पाकिस्तान बरोबर तुमची अंडरस्टँडिंग दिसते आहे. आम्ही तर पाकिस्तानचे दोन तुकडे केले. तुम्हाला पुलवामा हल्ल्याची साधी चौकशी केली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हीच खऱ्या अर्थाने पाकिस्तान धार्जीनी …

हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार, डॉ. भारती पवारांना दिलासा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क भाजप पदाधिकारी यांनी घेतलेल्या मध्यस्थीला यश आले असून दिंडोरीमधून इच्छुक असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभा निवडणूकीतून अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. चव्हाण यांना उमेदवारी नाकारल्याने नाराज झाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात …

आज माघारीच्या दिनी हरिश्चंद्र चव्हाण यांची काय असेल भूमिका?

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक लढविणार की, माघार घेणार याकडे लक्ष लागून आहे. त्यांच्या या भूमिकेनंतरच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. चव्हाण यांनी भाजपकडून उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, भाजपने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनाच पुन्हा एकदा तिकीट …

व्यूव्हरचनेचे फळ मिळाले, बोरस्ते यांची पक्षाच्या उपनेतेपदी बढती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात शिवसेना (शिंदे गट) पक्ष संघटना वाढीसाठी घेतलेले परिश्रम आणि लोकसभा निवडणुकीत नाशिकची उमेदवारी पक्षाकडेच राहावी, यासाठी यशस्वीरित्या आखलेली व्यूव्हरचनेचे फळ जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांना मिळाले असून, मुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना पक्षाच्या उपनेतेपदी बढती दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ …

केदा आहेरांच्या कार्यकर्त्यांच्या मनसुब्यांवर पाणी

देवळा ; नाशिक लोकसभेची जागा भाजपला सुटेल व भाजपा नेते केदा आहेर यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहेर व त्यांचे कार्यकर्ते बाळगून होते. परंतू तेथे शिंदे गटाला उमेदवारी देण्यात आल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमधे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. समर्थक कार्यकर्त्यांच्या नाराजीचा थेट फटका नाशिक, दिंडोरी सह धुळे लोकसभेतही काही अंशी बसू शकतो. गेल्या चाळीस वर्षांपासून …

उत्तर मध्य मुंबईतील भाजपचे धक्कातंत्र पाहून नाशिकमध्ये वाढली धाकधूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-  उत्तर मध्य मुंबईत उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच भाजपने धक्कातंत्राचा अवलंब करीत सोडविला. मात्र, यामुळे नाशिकमध्ये धाकधूक वाढली असून, असा प्रयोग नाशिकमध्येही शक्य असल्याचे बोलले जात असल्याने महायुतीत विशेषत: शिवसेनेत धाकधूक वाढली आहे. दरम्यान, उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या तिन्ही पक्षाच्या इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. उत्तर-मध्य मुंबईत भाजपने दोन वेळा लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या …

वंचितकडून मालती थविल यांना उमेदवारी, गुलाब बर्डेचा पत्ता कट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी लोकसभा मतदार संघात दिलेला उमेदवार वंचितने अवघ्या आठ दिवसांत बदलला आहे. वंचितने पाचव्या यादीत दिंडोरीत महाराष्ट्र केसरी आणि अहमदनगर जिल्ह्यातील पहिलवान गुलाब मोहन बर्डे यांना रिंगणात उतरविले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना प्रचारात उतरणे शक्य नसल्याने, वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीसोबत अखेरपर्यंत सूत्र जुळले नसल्याने …

पंतप्रधान नरेंद्र माेदींची तोफ धडाडणार, महायुतीचा प्रचार करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. सभेची तारीख आणि ठिकाण सध्या निश्चित नसले, तरी याबाबत भाजप गोटातून तयारी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील रणसंग्राम सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. स्टार प्रचारकांचे …

The post पंतप्रधान नरेंद्र माेदींची तोफ धडाडणार, महायुतीचा प्रचार करणार appeared first on पुढारी.

सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  जागावाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीने आघाडी घेतली असली तरी महायुतीच्या नेत्यांच्या जोरबैठका सुरूच आहेत. सातारा आणि नाशिक या प्रमुख लढतींसह नऊ जागांवर अजूनही एकमत झालेले नाही. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात छगन भुजबळ यांच्यासाठी नाशिक मतदारसंघ घ्या, अशी भाजपने भूमिका घेतल्यामुळे भुजबळ यांचे नाव जाहीर करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला विलंब लागत असल्याचे समजते. …

The post सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव? appeared first on पुढारी.