तब्बल 36 दिवसांनंतर मनमाड, नांदगावला कांदा लिलाव सुरू
मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मनमाड आणि नांदगाव या दोन्ही बाजार समितीत सोमवारी (दि. ६) तब्बल 36 दिवसांनंतर कांदा लिलाव सुरू झाले. कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी १५५० ते १६०० रुपये भाव मिळाला. हमाली, तोलाई कपाती वरून व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेऊन 30 मार्चपासून एका प्रकारे अघोषित …