मालेगावात गॅंगवार, भांडणाची कुरापत काढून दोघांच्या दिशेने गोळीबार
मालेगाव : पुढारी वृत्तसेवा- जुन्या भांडणाची कुरापत काढून संगमेश्वर भागातील दोघा तरुणांवर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी (दि.6) रात्री मध्यरात्री घडला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोमीन अराफत समिनउल्ला (29, रा. जगताप गल्ली) हा मित्र असर अंजुम यांच्यासह मित्र गणेश वडगेच्या घरून मारुती चौकात येत …