‘ठाणे हवे की नाशिक’ शिवसेनाच्या शिंदे गटाची कोंडी; राष्ट्रवादीही आक्रमक होऊन आज घेणार बैठक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘ठाणे हवे की नाशिक’ या कोंडीत शिवसेनेच्या शिंदे गटाला अडकविल्यानंतर आता भाजपने नाशिकची जागा ताब्यात घेण्यासाठी जाळे फेकले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची ‘वन-टू-वन’ चर्चा सुरू केली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातील आमदार ॲड. राहुल ढिकले यांना निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाकडून पुन्हा विचारणा झाली असून, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे …