कडक उन्हाळ्यातील लग्नसराई! उशीर होत असल्याने नाराजीचा सूर

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा कडक उन्हात घामाघूम झालेल्या पाहुणे मंडळींना ताटकळत ठेवून उशिराने लग्न लावणे हे फॅशनच होऊ पाहत आहे. याबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. १२.३५ चे लग्न पावणेदोनला लागते, मग लग्न मुहूर्त काढतात कशाला? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Summer Wedding) नाशिक जिल्ह्यात यंदा उन्हाची तीव्रता जास्त आहे. पारा ३५ …

नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार करून तिला फसवून दुसऱ्या युवतीशी विवाह करणाऱ्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पिडीत महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवरदेव हा देवळाली गावात वास्तव्यास आहे. पालिकेच्या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना! मालाड-मार्वे रस्ता काही तासातच खचला पंकज शरद कदम (रा. देवळाली गाव, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेने …

The post नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

नाशिक : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ जेव्हा आपल्या भाचीच्या लग्नात ठेका धरतात

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा  सध्या लग्नसराईची धूम सुरू असल्याने विवाह सोहळे अगदी दणक्यात सुरू आहेत. लग्न म्हटले की, कुटुंबीयांमध्ये मोठा उत्साह संचारलेला असतो. लग्न सोहळ्या आधी पार पडतो तो हळद समारंभ अन् या हळद समारंभात घरातील नातेवाईक, आप्तेष्ट व मित्रपरिवार अगदी मनमुरादपणे तल्लीन होऊन नृत्य करतात. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी देखील आपल्या नातेवाईकांच्या …

The post नाशिक : महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ जेव्हा आपल्या भाचीच्या लग्नात ठेका धरतात appeared first on पुढारी.

जळगाव : शेवटची इच्छा पूर्ण झाली म्हणत आईने सोडले प्राण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात एक मन हेलावून देणारी घटना घडली आहे. वर्षभरापासून कॅन्सरने ग्रस्त असलेल्या आईने आपल्या मुलाचे लग्न डोळ्यांनी पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र मुलाच्‍या हळदीच्‍याच दिवशी आईने अखेरचा श्वास घेतला. अशा परिस्थितीत नातेवाईकांनी जड अंतकरणाने मुलाचे लग्‍न लावून आईची ईच्‍छा पूर्ण केली. अमळनेर तालुक्यातील निम येथील रहिवाशी सरलाबाई …

The post जळगाव : शेवटची इच्छा पूर्ण झाली म्हणत आईने सोडले प्राण appeared first on पुढारी.

नाशिक : विवाहसोहळ्यांमध्ये चोरट्यांची हातसफाई, माजी महापौरांच्या पत्नीचे दागिने खेचले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विवाहसोहळे सुरू झाले असून, मंगलकार्यालये, लॉन्समध्ये विवाह होत आहेत. या ठिकाणी चोरटेही वावरत असून, ते संधी मिळताच चोर्‍या करीत आहेत. चोरट्यांनी यावेळी माजी महापौर यतीन वाघ यांच्या पत्नीच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे दागिने खेचून पळ काढल्याची घटना लंडन पॅलेसजवळ घडली. हितेश यतीन वाघ (रा. शालिमार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या गुरुवारी (दि. 8) …

The post नाशिक : विवाहसोहळ्यांमध्ये चोरट्यांची हातसफाई, माजी महापौरांच्या पत्नीचे दागिने खेचले appeared first on पुढारी.

नाशिक : म्हसरूळला 11 जोडप्यांच्या सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा म्हसरूळ येथील एकता ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त मंडळातील ज्या सभासदांच्या विवाहास 50 वर्षे पूर्ण झाली, अशा 11 जोडप्यांचा पुनर्विवाह लावण्यात आला. नेवासा : भरधाव कंटेनरने दोघा मजुरांना चिरडले या सोहळ्यामध्ये मंडळाचे अहिल्याबाई प्रतापराव वाढणे यांच्यासह धाडगे, चंदणे, बनकर, सूर्यवंशी, खांडेकर, अहिरे, कुलकर्णी, परमार, चव्हाण व गवारे या जोडप्यांच्या विवाह लावण्यात …

The post नाशिक : म्हसरूळला 11 जोडप्यांच्या सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव appeared first on पुढारी.