नाशिक : रानभाजी खाल्ल्याने नऊ जणांना विषबाधा

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव काचुर्ली येथील आदिवासी कुटुंबाने रानभाजी खाल्ल्याने नऊ सदस्यांना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळीच उपचारामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे. मंगळवारी सकाळी न्याहारी करताना पारधी कुटुंबातील महिलेने रानात नैसर्गिकरीत्या उगवलेले भुईफोड या भूछत्राची भाजी तयार केली. ती भाजी खाणारे सर्व व्यक्तींना अचानक चक्कर येणे, डोके दुखणे, …

The post नाशिक : रानभाजी खाल्ल्याने नऊ जणांना विषबाधा appeared first on पुढारी.

नाशिकच्या सुरगाण्यात महाप्रसादातून ६० जणांना विषबाधा

सुरगाणा( जि. नाशिक) : प्रतिनिधी तालुक्यातील ठाणगाव बा-हे येथे हनुमान जयंती सप्ताहानिमित्त शुक्रवारी (दि. 7) सकाळी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादातून साठ जणांना विषबाधा झाली. गूडफ्रायडेनिमित्त परिसरातील शासकीय रुग्णालयांमध्ये सुटी असल्याने रुग्णांवर त्वरित उपचार होऊ शकले नाहीत. परिणामी रुग्णसंख्येत वाढ झाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ठाणगाव येथे हनुमान जयंतीनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले …

The post नाशिकच्या सुरगाण्यात महाप्रसादातून ६० जणांना विषबाधा appeared first on पुढारी.

जळगाव :केळी पिकावर फवारणीदरम्यान औषध डोळ्यात गेल्याने महिलेचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा केळी पिकावर फवारणी करताना विषारी औषध डोळ्यात व अंगावर पडल्याने जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील महिलेला विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. जिजाबाई विश्वनाथ सोनवणे (५५, रा.नंदगाव, जि.जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. नंदगाव येथे …

The post जळगाव :केळी पिकावर फवारणीदरम्यान औषध डोळ्यात गेल्याने महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.

नाशिक : एकाच कुटुंबातील सात जणांना जेवणातून विषबाधा 

नाशिक, दिंडोरी: पुढारीे वृत्तसेवा तालुक्यातील शिवार पाडा येथे एकाच कुटुंबातील सात सदस्यांना जेवणातून विषबाधा झाली असून, सर्वांवर ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जात आहे. पश्चिम आदिवासी भागात असलेल्या शिवार पाडा येथे राऊत कुटुंबीयांनी दुपारी जेवण केल्यानंतर सातही व्यक्तींना जुलाब, वांत्या, पोटदुखी असा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना ननाशी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर …

The post नाशिक : एकाच कुटुंबातील सात जणांना जेवणातून विषबाधा  appeared first on पुढारी.

नाशिक : भेसळयुक्त भगरीमुळे 33 जणांना विषबाधा

अंदरसूल/सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्याच्या पूर्व भागातील अंदरसूल व भारम प्राथमिक केंद्रांतर्गत भेसळयुक्त भगरीच्या सेवनातून दोन दिवसांत तब्बल 33 नागरिकांना विषबाधा झाली असून, सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथेही 12 जणांना विषबाधा झाली आहे. नाशिक जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. उदय बरगे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कातकाडे, आरोग्य विस्तार अधिकारी आर. एस. खैरे यांच्या …

The post नाशिक : भेसळयुक्त भगरीमुळे 33 जणांना विषबाधा appeared first on पुढारी.

नाशिक : विषबाधा झाल्याने आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी येथील गतिमंद विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत विषबाधा झाल्याने दोन गतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन विद्यार्थी गंभीर असून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर चार विद्यार्थ्यांवर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे इगतपुरीसह जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे. या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक …

The post नाशिक : विषबाधा झाल्याने आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.