नाशिकमध्ये सिलेंडरचा स्फोट, 2 जण जखमी

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क ; नाशिकच्या इंदिरानगर परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन जण गंभीर भाजले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे. इंदिरानगर परिसरातील एका पार्सल पॉइंटच्या दुकानात हा स्फोट झाला. सिलेंडरची जोडणी केली जात असताना स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पोलिसांचे श्वान पथक याठिकाणी दाखल झाले आहे. …

The post नाशिकमध्ये सिलेंडरचा स्फोट, 2 जण जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सिलेंडरचा स्फोट, 2 जण जखमी

नाशिक : पाथर्डी-वडनेर रस्त्यालगत दुचाकी घसरून तरुण ठार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर परिसरात पाथर्डी-वडनेर रस्त्यालगत 35 वर्षीय मद्यधुंद तरुणाचा दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल सदानंद जाधव (35, रा. सातपूर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत जाधव यास दारूचे व्यसन होते. शुक्रवारी (दि. 2) रात्री 1.30 च्या सुमारास घरच्यांना न सांगता आपल्या दुचाकीने …

The post नाशिक : पाथर्डी-वडनेर रस्त्यालगत दुचाकी घसरून तरुण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाथर्डी-वडनेर रस्त्यालगत दुचाकी घसरून तरुण ठार

जळगाव : वृद्धाची हत्या, नाल्यात आढळला मृतदेह

जळगाव : पुढारी वृत्तसेवा यावल तालुक्यातील किनगाव येथील इंदिरानगर भागातील रहिवाशी ६० वर्षीय वृद्धाची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची बाब शुक्रवार, दि. 24 रोजी सकाळी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चुंचाळेकडे जाणार्‍या रस्त्यावर एका नाल्याच्या पुलाखाली शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला असून घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. किनगाव, ता.यावल येथील इंदिरानगर भागातील …

The post जळगाव : वृद्धाची हत्या, नाल्यात आढळला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : वृद्धाची हत्या, नाल्यात आढळला मृतदेह

नाशिक : इंदिरानगर भागात टवाळखोरांचा सुळसुळाट, पोलिस गस्त वाढविण्याची मागणी

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर परिसरात टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांचा वचकच राहिला नसून दिवसेंदिवस समस्येत वाढ होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. इंदिरानगर परिसरातील राजीवनगर, विशाखा कॉलनी, एकता कॉलनी, राजीव टाउनशिप, भगवती चौक यासह विविध भागांत अनेक मोकळे भूखंड तसेच महापालिकेची …

The post नाशिक : इंदिरानगर भागात टवाळखोरांचा सुळसुळाट, पोलिस गस्त वाढविण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इंदिरानगर भागात टवाळखोरांचा सुळसुळाट, पोलिस गस्त वाढविण्याची मागणी

नाशिक : विष सेवन केलेल्याचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विष सेवन केलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकाश बाबूलाल ढोमणे (55, रा. सराफ लॉन्स, इंदिरानगर) असे या व्यक्तीचे नाव आहे. प्रकाश यांनी राहत्या घरात विष सेवन केल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. 12) दुपारी त्यांचा मृत्यू झाला. हेही वाचा: सावरकर-टीपू सुलतानच्या पोस्टरवरून वाद; कर्नाटकमधील शिवमोगा शहरात जमावबंदी …

The post नाशिक : विष सेवन केलेल्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विष सेवन केलेल्याचा मृत्यू