उद्धव ठाकरे यांनी केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल : गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सत्तेच्या मोहापायी उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस आघाडीसोबत जाण्याची केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल, असे टीकास्त्र मंत्री गिरीश महाजन यांनी सोडले. आपल्या राजकीय जीवनात ठाकरे यांनी केलेली चूक अक्षम्य असल्याचे असल्याचे मतही त्यांनी नोंदवले. गुढीपाडवा उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर महाजन प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, भाजपसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती असताना …

The post उद्धव ठाकरे यांनी केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे यांनी केलेली चूक त्यांना आयुष्यभर भोवेल : गिरीश महाजन

भाजपच्या पक्षचिन्हासोबत छेडछाड, काँग्रेसच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सोशल मीडियावर पक्षचिन्हाशी छेडछाड करीत विद्रूपीकरण केल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या सहा पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हृषिकेश शिरसाठ (२३, रा. चार्वाक चौक) याच्या फिर्यादीनुसार, पंकज सोनवणे, महेश देवरे, देवेन मारू, गणेश कोठुळे, हेमंत पवार व सागर पिंपळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर भाजपच्या पक्षचिन्हासोबत …

The post भाजपच्या पक्षचिन्हासोबत छेडछाड, काँग्रेसच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading भाजपच्या पक्षचिन्हासोबत छेडछाड, काँग्रेसच्या 6 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

भारत जोडो न्याय यात्रेमुळे काँग्रेसमध्ये उत्साह; शहर-ग्रामीणमध्ये जोरदार तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेस खा. राहुल गांधी यांनी सुरु केलेली भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी (दि. १३) मालेगाव जिल्ह्यात दाखल होत आहे. त्यामुळे ग्रामीण काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. यात्रेची जोरदार तयारी केली असून यात्रा मार्ग, चौक सभांचे नियोजन केले आहे. तसेच शहर पदाधिकाऱ्यांनीही जय्यत तयारी करीत यात्रा मार्गात देखावे, स्वागत कमान, फलकबाजी करून …

The post भारत जोडो न्याय यात्रेमुळे काँग्रेसमध्ये उत्साह; शहर-ग्रामीणमध्ये जोरदार तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading भारत जोडो न्याय यात्रेमुळे काँग्रेसमध्ये उत्साह; शहर-ग्रामीणमध्ये जोरदार तयारी

नाशिक : रयत क्रांतीकडून काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

येवला (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  भाजीपाला पिकाच्या दरवाढीविरोधात आंदोलन केल्याबद्दल काँग्रेसविरोधात रयत क्रांती संघटनेकडून बुधवारी (दि.26) निषेध आंदोलन करून काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. सत्यगाव येथे रयत क्रांती संघटनेचे वाल्मीक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. काँग्रेसकडून टोमॅटो व भाजीपाल्याचे वाढलेल्या दराविरोधात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत असून, या आंदोलनात काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करून निषेध …

The post नाशिक : रयत क्रांतीकडून काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रयत क्रांतीकडून काँग्रेसच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

नाशिक : काँग्रेसकडून ‘ब्लॉक प्रभारीं’च्या नियुक्त्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणी तसेच उमेदवारांच्या चाचपणीसाठी शहर काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या निर्देशानुसार विविध ब्लॉकमध्ये बैठका घेण्यासाठी जिल्हा प्रभारी डॉ. राजू वाघमारे व शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी प्रभारींची नियुक्ती केली आहे. मध्य नाशिक ब्लॉक काँग्रेसच्या प्रभारीपदी …

The post नाशिक : काँग्रेसकडून 'ब्लॉक प्रभारीं'च्या नियुक्त्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काँग्रेसकडून ‘ब्लॉक प्रभारीं’च्या नियुक्त्या

काँग्रेस म्हणू… काँग्रेसच आणू, नाशिक शहरात सर्वत्र झळकले फलक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय भूकंपानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीमुळे महाविकास आघाडीचे समीकरणे बदलण्यास सुरूवात झाली आहे. त्याचा प्रत्यय सध्या नाशिक शहरात बघावयास मिळत आहे. ‘काँग्रेस म्हणू… काँग्रेसच आणू’ असे फलक शहरात सर्वत्र झळकत आहे. हे फलक सध्या नाशिककरांचे लक्ष वेधून घेत आहे. नाशिकमध्ये काँगेसने …

The post काँग्रेस म्हणू... काँग्रेसच आणू, नाशिक शहरात सर्वत्र झळकले फलक appeared first on पुढारी.

Continue Reading काँग्रेस म्हणू… काँग्रेसच आणू, नाशिक शहरात सर्वत्र झळकले फलक

नाशिक : ठाकरे गटाला आणखी झटके बसणार; ग्रामविकासमंत्र्यांचे टीकास्त्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना ठाकरे गटातील आमदार-खासदार पक्षाला कंटाळले असून, वर्धापनदिनी आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका दिला. भविष्यातही उद्धव ठाकरे यांना आणखी झटके बसणार आहेत. ठाकरे यांच्यासोबत सकाळच्या भोंग्याशिवाय कोणी ही नसेल, अशी टीका राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली. ना. महाजन रविवारी (दि.१८) नाशिक दौऱ्यावर …

The post नाशिक : ठाकरे गटाला आणखी झटके बसणार; ग्रामविकासमंत्र्यांचे टीकास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठाकरे गटाला आणखी झटके बसणार; ग्रामविकासमंत्र्यांचे टीकास्त्र

जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा देशामध्ये विविध राज्यांचे राजकीय चित्र बदलत आहे. गोवा, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नव्हते. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. जनतेने त्यांना राज्यातील सत्तेपासून दूर ठेवले आहे आणि तसाच सूर केंद्राच्या निवडणुकींमध्ये असेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्य अधिवेशन शुक्रवारी (दि.16) अमळनेरमध्ये झाले, यावेळी ते …

The post जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा देशामध्ये विविध राज्यांचे राजकीय चित्र बदलत आहे. गोवा, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नव्हते. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. जनतेने त्यांना राज्यातील सत्तेपासून दूर ठेवले आहे आणि तसाच सूर केंद्राच्या निवडणुकींमध्ये असेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्य अधिवेशन शुक्रवारी (दि.16) अमळनेरमध्ये झाले, यावेळी ते …

The post जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

नाशिक : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खारघर दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र सरकार आयोजित खारघर ये‌‌थील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी वीस लाखांपेक्षा जास्त श्री सदस्य राज्यभरातून उपस्थित होते. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे १४ जणांना जीव गमवावा लागला. या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमस्थळी उपस्थितांसाठी मंडप, पिण्याचे …

The post नाशिक : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खारघर दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खारघर दुर्घटनेप्रकरणी काँग्रेसची मागणी