Nashik | सोमवारनंतर महसूलमधील बदल्यांचा दुसरा टप्पा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागात पहिल्या टप्प्यात तब्बल ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सोमवार (दि. ५) नंतर दुसऱ्या टप्प्यातील बदल्यांना मुहूर्त लागणार आहे. त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. मार्च-एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. तत्पूर्वी शासनाकडून सर्वच शासकीय विभागांत खांदेपालट करण्यात येत आहे. शुक्रवारी …

The post Nashik | सोमवारनंतर महसूलमधील बदल्यांचा दुसरा टप्पा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | सोमवारनंतर महसूलमधील बदल्यांचा दुसरा टप्पा

नाशिक : विभागातील एकवीस तहसीलदारांमध्ये खांदेपालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महसूल विभागात उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांनंतर तहसीलदारांमध्ये खांदेपालट करण्यात आला आहे. नाशिक विभागातील २१ तहसीलदारांच्या बदल्यांम‌ध्ये नाशिक तहसीलदार अनिल दौंडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल चिटणीस राजेंद्र नजन, इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे आदींचा समावेश आहे. राज्य शासनाने दोनच दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यापाठोपाठ बुधवारी (दि. १२) रात्री उशिरा तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले. नाशिकचे तहसीलदार …

The post नाशिक : विभागातील एकवीस तहसीलदारांमध्ये खांदेपालट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विभागातील एकवीस तहसीलदारांमध्ये खांदेपालट

Nashik Police : ग्रामीणमधील २९ निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे पाेलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी बुधवारी (दि.8)  जिल्ह्यातील २९ पाेलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या केल्या. बहुतांश पाेलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने या अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्याचे समजते. पोलिस अधीक्षक उमाप यांनी दिलेल्या आदेशानुसार, ओझर विमानतळ सुरक्षेची जबाबदारी असलेले अशोक पवार यांची पिंपळगाव …

The post Nashik Police : ग्रामीणमधील २९ निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Police : ग्रामीणमधील २९ निरीक्षक, सहायक निरीक्षकांच्या बदल्या

नाशिक : आठवड्याभरात महसूलमध्ये खांदेपालट शक्य, शासनाने मागविली माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने महसूल विभागात एकाच पदावर तीन वर्षे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती मागवलीची समजते आहे. तसेच महसूलमधून अन्य शासकीय विभागात वर्ग केलेल्या अधिकाऱ्यांना मूळ सेवेत रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या आठवड्याभरात महसूल विभागात खांदेपालट होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील सत्तापालट, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुका तसेच सण-उत्सवांमुळे महसूल …

The post नाशिक : आठवड्याभरात महसूलमध्ये खांदेपालट शक्य, शासनाने मागविली माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठवड्याभरात महसूलमध्ये खांदेपालट शक्य, शासनाने मागविली माहिती

नाशिक : एमआयडीसीत खांदेपालट; नवे प्रादेशिक अधिकारीपदी उदय किसवे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अधिकार्‍यांच्या बदल्यांच्या सपाटा सुरू झाला असून, आता महामंडळांतही खांदेपालट करण्यात आले आहे. राज्यातील तब्बल नऊ एमआयडीसी अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनाही कार्यमुक्तीचे आदेश काढण्यात आल्याची माहिती समोर येत असून, त्यांच्या जागी उदय किसवे हे नवे प्रादेशिक अधिकारी असतील, अशी चर्चा आहे. वालचंदनगर : ‘माझ्या …

The post नाशिक : एमआयडीसीत खांदेपालट; नवे प्रादेशिक अधिकारीपदी उदय किसवे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एमआयडीसीत खांदेपालट; नवे प्रादेशिक अधिकारीपदी उदय किसवे