विजय करंजकर यांची पुन्हा ‘मातोश्री’कडे पाठ, दुसऱ्यांदा भेट टाळली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने ऐनवेळी उमेदवारी कापत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना चाल दिल्याने नाराज असलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी दुसऱ्यांदा ‘मातोश्री’वरून बोलवणे येऊनदेखील पाठ फिरवल्याने चर्चेला उधाण आले आहे. करंजकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमधून महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख विजय …

The post विजय करंजकर यांची पुन्हा 'मातोश्री'कडे पाठ, दुसऱ्यांदा भेट टाळली appeared first on पुढारी.

Continue Reading विजय करंजकर यांची पुन्हा ‘मातोश्री’कडे पाठ, दुसऱ्यांदा भेट टाळली

बडगुजरांपाठोपाठ भाजपच्या व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या समवेत डान्स पार्टी प्रकरणात शिवसेना-ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भाजपचा पदाधिकारी आणि सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मोरेवर गुन्हा का नाही? असा सवाल ठाकरे गटासह विरोधकांकडून उपस्थित केला जात …

The post बडगुजरांपाठोपाठ भाजपच्या व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading बडगुजरांपाठोपाठ भाजपच्या व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल

ठाकरे गटाच्या नेत्यासमोर शिंदेंच्या युवा सेनेची घोषणाबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आगामी नाशिक दौऱ्याच्या नियोजनाच्या निमित्ताने गोदाघाटावर पाहणीसाठी आलेल्या खासदार विनायक राऊत व वरुण सरदेसाई यांच्यासमोर शिंदे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी रामकुंड परिसरात जोरदार घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, पंचवटी पोलिसांनी घोषणा देणाऱ्या युवा सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात पाचारण करत ‘समज’ दिल्याचे वृत्त आहे. १९९५ नंतर …

The post ठाकरे गटाच्या नेत्यासमोर शिंदेंच्या युवा सेनेची घोषणाबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरे गटाच्या नेत्यासमोर शिंदेंच्या युवा सेनेची घोषणाबाजी

ठाकरे गटाला नाशकात पुन्हा खिंडार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेनेच्या ‘उबाठा’ गटाला नाशिकमध्ये पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. विद्यार्थी सेनेच्या माजी उपमहानगर प्रमुखासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, आ. देवयानी फरांदे, गिरीश पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी ठाकरे गटाच्या विदयार्थी सेनेचे माजी …

The post ठाकरे गटाला नाशकात पुन्हा खिंडार appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरे गटाला नाशकात पुन्हा खिंडार

ड्रग्जविराेधात नाशिकमध्ये शिवसेनेचा ‘आक्राेश’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; येथील अमली पदार्थांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे शुक्रवारी (दि. २०) शहरातून आक्राेश मोर्चा काढण्यात आला. यावेळी पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या माेर्चावेळी पालकमंत्री दादा भुसे व सरकारचा निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी पालकमंत्री हटवा, नाशिक वाचवा; शासन आपल्या दारी वल्गना करी, नाशिकची तरुणाई होत आहे ड्रग्जमुळे भिकारी …

The post ड्रग्जविराेधात नाशिकमध्ये शिवसेनेचा 'आक्राेश' appeared first on पुढारी.

Continue Reading ड्रग्जविराेधात नाशिकमध्ये शिवसेनेचा ‘आक्राेश’

धुळे : कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीच्या विरोधात ठाकरे गट आणि शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

धुळे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यात करात वाढ केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज (दि.२२) शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदे फेकून आंदोलन केले. वाढीव निर्यात शुल्क मागे न घेतल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के करवाढ केल्याचा परिणाम धुळे शहरात देखील दिसून आले. …

The post धुळे : कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीच्या विरोधात ठाकरे गट आणि शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कांद्याच्या निर्यात शुल्क वाढीच्या विरोधात ठाकरे गट आणि शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा पहाटेच्या शपथविधीवर कोणी कोणाची विकेट घेतली यावर चर्चा सुरू असतानाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील यात उडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नाशिक येथील संयुक्त मोर्चा संमेलनात माध्यमांशी बोलताना दानवे यांनी काल-परवा शरद पवार यांनी सत्तेसाठी आम्ही सरकार पाडले, असे म्हटले पण तसे बघितले तर त्यांनी वसंतदादांचे सरकार का पाडले …

The post खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे

नाशिक : ठाकरे गटात प्रवेशाचा डॉ. अपूर्व हिरेंनी केला इन्कार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मला कोणतीही अडचण नाही. पक्षाचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत आहे व पक्षात राहूनच महाविकास आघाडी युतीचा धर्म पाळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी दिल्याने ठाकरे गट शिवसेना प्रवेशावरील चर्चेवर सध्या पडदा पडला …

The post नाशिक : ठाकरे गटात प्रवेशाचा डॉ. अपूर्व हिरेंनी केला इन्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठाकरे गटात प्रवेशाचा डॉ. अपूर्व हिरेंनी केला इन्कार

नाशिक : ठाकरे गटाच्या प्रभाग प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या आणखी काही नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. नाशिकरोड उपमहानगर समन्वयक नीलेश कर्डिले, संजय गायकवाड, विजय काळदाते, विभाग समन्वयक नाना शिंदे, दीपक टावरे, उपविभाग संघटक सतीश मुनित, सचिन अरिंगळे, प्रभागप्रमुख विनायक आढाव, राहुल …

The post नाशिक : ठाकरे गटाच्या प्रभाग प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ठाकरे गटाच्या प्रभाग प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाची दुरावस्था; ठाकरे गटाचे दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्यातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आज आंदोलन केले. स्वातंत्र्यवीरांचा हा पुतळा महापौर आणि उपमहापौर यांच्या प्रभागात असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत आंदोलकांनी महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांवर देखील शरसंधान केले आहे. धुळ्यातील पांझरा नदीच्या काठावर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर …

The post धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाची दुरावस्था; ठाकरे गटाचे दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाची दुरावस्था; ठाकरे गटाचे दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन