आजही राष्ट्रवादीचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी माघारी घेतलेली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक लोकसभेवरील दावा सोडलेला नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीच्या कार्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते …

Continue Reading आजही राष्ट्रवादीचा नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम

Lok Sabha Election 2024 | उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांचा दावा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभेच्या निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये एकमत होत नसल्याचे समोर आले आहे. केंद्राच्या नेतृत्वाने नाव दिले असले तरी नावाची घोषणा होण्यात होणारा विलंब बघता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. संपूर्ण जिल्ह्यातील १५ पैकी सहा विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या आमदारांचे वर्चस्व आहे. मात्र, जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक लोकसभेसाठी कुठेच संधी …

Continue Reading Lok Sabha Election 2024 | उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांचा दावा कायम

जिल्हा प्रशासनाने बोलाविली आज राजकीय पक्षांची बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी शुक्रवार (दि. २६) पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने सोमवारी (दि. २२) राजकीय पक्षांची बैठक बोलाविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा हे मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणूक कार्यक्रमात नाशिक, दिंडोरी व धुळे …

Continue Reading जिल्हा प्रशासनाने बोलाविली आज राजकीय पक्षांची बैठक

नाशिक हवं असेल तर…. महायुतीत रंगला वाद

नाशिक  : पुढारी वृत्तसेवा नाशिक हवे असल्यास ठाणे भाजपला द्या, अशी सूचना भाजप नेत्यांनी शिंदे गटाला केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव पुढे आल्याचे समजते. मुंबई, ठाण्यातील पाच जागा आणि नाशिक सहावी जागा या जागांच्या वाटपावरून महायुतीत वाद सुरु आहे. यापूर्वी संभाजी नगर आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जागांवर तोडगा काढण्यात आला. …

Continue Reading नाशिक हवं असेल तर…. महायुतीत रंगला वाद

भुजबळांची माघार; तरीही महायुतीत ‘कोल्ड वॉर’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभेचे मतदान शेवटच्या पाचव्या टप्प्यात होणार असले तरी, त्याबाबतची प्रक्रिया अवघ्या चार दिवसांनी (दि. २६) सुरू होणार आहे. मात्र, अशातही महायुतीचा उमेदवार घोषित केला जात नसल्याने, भाजप-सेनेत धुसफुस वाढली आहे. विशेष म्हणजे तिकिटाच्या रेसमध्ये अग्रस्थानी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर माघार घेतल्यानंतरही उमेदवारीचा पेच …

Continue Reading भुजबळांची माघार; तरीही महायुतीत ‘कोल्ड वॉर’

भुजबळ माघारी, गोडसेंना उभारी !

शिंदे गट, भाजप की, राष्ट्रवादी अजित पवार गट अशा अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणारी नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारी स्पर्धेतील माघारीने वेगळ्या वळणावर येऊन ठेपली. आपल्या माघारीची घोषणा स्वत: भुजबळ यांनी माध्यम संवादात केल्याने महायुतीचा नाशिकचा उमेदवार शिंदे गटाचा आणि तोदेखील हेमंत गोडसेच असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. या घडामोडीनंतर …

Continue Reading भुजबळ माघारी, गोडसेंना उभारी !

‘आता लढायचं आणि जिंकायचं’, ‘खूप केलं नेत्यांसाठी, यंदा लढू बाबांसाठी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून महायुतीकडून इच्छुक असलेल्या शांतिगिरी महाराज यांनी आठ दिवसांचे अनुष्ठान केले होते. अनुष्ठानानंतर त्यांनी अपक्ष निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बाबांच्या भक्त परिवाराने ‘खूप केलं नेत्यांसाठी यंदा लढू बाबांसाठी’, ‘आता लढायचं आणि जिंकायचं’ असा नारा दिला. त्यामुळे नाशिकमध्ये महायुती, महाआघाडी व अपक्ष शांतिगिरी महाराज असा तिहेरी सामना रंंगण्याची शक्यता …

Continue Reading ‘आता लढायचं आणि जिंकायचं’, ‘खूप केलं नेत्यांसाठी, यंदा लढू बाबांसाठी’

नाराज प्रचारात होतील सहभागी : जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नाशिक व धुळे जिल्हाध्यक्षांनी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली. पक्षाकडूनही नाराजांचे राजीनामे मंजूर झाले आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी प्रचारास सुरुवात केली आहे. तर नाराज पदाधिकारी लवकरच प्रचारात सहभागी होतील, असा विश्वास कोतवाल यांनी वर्तवला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून नाशिकचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष …

The post नाराज प्रचारात होतील सहभागी : जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाराज प्रचारात होतील सहभागी : जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल

पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा, मुख्यमंत्र्यांच्या भेटी-गाठी, तिकिटासाठी आग्रही भूमिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील जागेवरून महायुतीत रणकंदन सुरू असून, जागा पदरात पाडून घेण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा दिसून येत आहे. उमेदवारीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असले, तरी विद्यमान खासदार हेमंत गोडसे आपला दावा कायम ठेवून आहेत. ते रविवारी (दि. १४) पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठाण्यात गेले होते. याठिकाणी त्यांनी तिकिटासाठी आग्रही भूमिका घेतल्याची …

The post पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा, मुख्यमंत्र्यांच्या भेटी-गाठी, तिकिटासाठी आग्रही भूमिका appeared first on पुढारी.

Continue Reading पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा, मुख्यमंत्र्यांच्या भेटी-गाठी, तिकिटासाठी आग्रही भूमिका

सस्पेन्स, धाकधूक कायम! हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या दारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दोन वेळा प्रबळ मताधिक्क्याने निवडून येऊनदेखील उमेदवारी मिळविण्यात अद्यापपर्यंत अपयशी ठरलेल्या खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा पक्षाचे सर्वोच्च नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाणे येथील शुभ-दीप निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गोडसे यांना दिल्याची माहिती समोर येत आहे. …

The post सस्पेन्स, धाकधूक कायम! हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या दारी appeared first on पुढारी.

Continue Reading सस्पेन्स, धाकधूक कायम! हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या दारी