धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी चौघांचे निलंबन

नाशिक : ठाणे आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामध्ये विजय गांगुर्डे (प्रादेशिक व्यवस्थापक, जव्हार), अविनाश राठोड (उपप्रादेशिक व्यवस्थापक, शहापूर), आशिष वसावे (व्यवस्थापक, प्रशासन व विपणन, शहापूर), गुलाब सदगीर – प्रतवारीकार (उपप्रादेशिक कार्यालय, शहापूर ) यांचा समावेश आहे. संबंधितांविरोधात …

The post धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी चौघांचे निलंबन appeared first on पुढारी.

Continue Reading धान खरेदी गैरव्यवहार प्रकरणी चौघांचे निलंबन

नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल

नाशिक : गौरव अहिरे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लाचखाेरांवर कारवाई झाल्यानंतर निलंबन, बडतर्फी, मालमत्ता गोठवणे, मालमत्तेची माहिती देण्याची जबाबदारी संबंधित विभागांची असते. मात्र, विभागामार्फत लाचखोरांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र आहे. राज्यात १९१ लाचखोरांना निलंबित केलेले नसून १८ जणांना शिक्षा होऊनही बडतर्फ केलेले नाही. तर ९ प्रकरणांमध्ये लाचखोरांची मालमत्ता गोठवण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे …

The post नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल

नाशिक : लाचखोर जिल्हा निबंधक खरे याचे अखेर निलंबन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 30 लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटकेत असलेल्या जिल्हा उपनिबंधक संशयित सतीश खरेच्या ११ बँक खात्यांची तपासणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू आहे. त्याचप्रमाणे इतर व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे. बुधवारी (दि. १७) विभागाने खरेना विविध ठिकाणी नेत चौकशी केली. दरम्यान सहकार विभागानेही खरेच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत कायदेशीर …

The post नाशिक : लाचखोर जिल्हा निबंधक खरे याचे अखेर निलंबन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर जिल्हा निबंधक खरे याचे अखेर निलंबन

नाशिक : विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन प्रकरण ; भुवन शासकीय आश्रमशाळेच्या अधीक्षिकेचेही निलंबन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विद्यार्थिनीसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याप्रकरणी भुवन येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे अधीक्षक राहुल सुरेश तायडे यांचे निलंबन केल्याची घटना ताजी असतानाच आता याच शाळेतील महिला अधीक्षिकेची गच्छंती करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेऊन अधीक्षिका प्रियंका दीपक उके यांच्याविराेधात नाशिकचे प्रकल्प अधिकारी जितीन रहमान यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. एकाच शाळेतील …

The post नाशिक : विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन प्रकरण ; भुवन शासकीय आश्रमशाळेच्या अधीक्षिकेचेही निलंबन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन प्रकरण ; भुवन शासकीय आश्रमशाळेच्या अधीक्षिकेचेही निलंबन

Nashik : नांदगावला वनक्षेत्रपालासह तिघे निलंबित, अनधिकृत बांधकाम न रोखल्याचा ठपका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वनजमिनीची परस्पर विक्री तसेच त्या जमिनीवर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम रोखण्यात कुचराईबद्दल नांदगावच्या (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह दोघा कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. राखीव वनक्षेत्रातील अनधिकृत बांधकामाला अभय दिल्याचा ठपका ठेऊन नाशिक पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे यांनी संबंधित वनक्षेत्रपालासह तिघांचे निलंबन केले आहे. त्यामध्ये आरएफओ चंद्रकांत कासार, वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक …

The post Nashik : नांदगावला वनक्षेत्रपालासह तिघे निलंबित, अनधिकृत बांधकाम न रोखल्याचा ठपका appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगावला वनक्षेत्रपालासह तिघे निलंबित, अनधिकृत बांधकाम न रोखल्याचा ठपका

धुळे : जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार अनधिकृतपणे वापरल्याने शिंदखेडाचे तहसीलदार निलंबित

धुळे : पुढारी वृत्तसेवा कुळ कायद्यासंदर्भात जमिनीचे वर्ग बदलाचे जिल्हाधिकारी यांना असलेले अधिकार परस्पर वापरल्याचा ठपका ठेवत शिंदखेडाचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा पदभार शिरपूरचे तहसीलदार आबा महाजन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान सैंदाणे यांच्यावर दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई होत आहे. शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील गट क्रमांक 64 ही जमीन नियंत्रण …

The post धुळे : जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार अनधिकृतपणे वापरल्याने शिंदखेडाचे तहसीलदार निलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार अनधिकृतपणे वापरल्याने शिंदखेडाचे तहसीलदार निलंबित

जळगाव : तमाशात नाचताना व्हिडीओ व्हायरल; सहाय्यक फौजदाराचे निलंबन

जळगाव : तालुक्यातील खेडी बु. येथे तमाशाच्या फडात नाचणार्‍या सहाय्यक फौजदार भटू विरभान नेरकर याच्यावर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबनाची कारवाई केली असून याबाबतचे आदेश त्यांनी काढले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात जळगाव शहरातील निवृत्ती नगरात वाळू व्यावसायातील वर्चस्वाच्या वादातून भावेश उत्तम पाटील (रा. आव्हाणे) या तरुणाच्या …

The post जळगाव : तमाशात नाचताना व्हिडीओ व्हायरल; सहाय्यक फौजदाराचे निलंबन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तमाशात नाचताना व्हिडीओ व्हायरल; सहाय्यक फौजदाराचे निलंबन

जळगाव : आक्षेपार्ह वक्तव्य भोवले, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बकाले अखेर निलंबित

जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. मात्र, समाजबांधवांकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. समाजाचा रोष लक्षात घेता, पोलीस अधीक्षकांनी तात्काळ बकाले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन तो विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केला होता. त्यानुसार या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात येवून …

The post जळगाव : आक्षेपार्ह वक्तव्य भोवले, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बकाले अखेर निलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आक्षेपार्ह वक्तव्य भोवले, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बकाले अखेर निलंबित