Nashik I आधारतीर्थ आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील आत्महत्याग्रहस्त शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांसाठीच्या आधारतीर्थ आश्रमात वास्तव्यास असलेल्या राधिका वाल्मीक शेटे (13) या मुलीचा आकस्मिक मृत्यू झाला. त्र्यंबक पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 27) सकाळी सव्वासातच्या सुमारास राधिका आश्रमात चक्कर येऊन पडली. तिला व्यवस्थापक अशोक पाटील व महिला कर्मचारी यांनी तातडीने त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. …

The post Nashik I आधारतीर्थ आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik I आधारतीर्थ आश्रमात अल्पवयीन मुलीचा मृत्यू

नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्च महिन्यात वर्चस्ववादातून बजरंगवाडी येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील २० गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता. पिंपरी: नोकरीच्या आमिषाने सतरा जणांची …

The post नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बजरंगवाडी हाणामारी प्रकरणातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक क्राईम : घरातून दागिने, रोकड, मोबाइल लंपास

नाशिक : मखमलाबाद नाका परिसरातील ललवाणी सदन येथून चोरट्याने घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकड व मोबाइल चोरून नेला. बुधवारी (दि.२१) मध्यरात्री ही घटना घडली. या प्रकरणी राजेंद्र पृथ्वीराज ललवाणी (५५) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे. उद्यानातून चंदनाच्या झाडाची चोरी नाशिक : कालिदास कलामंदिराच्या पाठीमागील उद्यानातून चार चोरट्यांनी चंदनाचा वृक्ष तोडून त्याचा …

The post नाशिक क्राईम : घरातून दागिने, रोकड, मोबाइल लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : घरातून दागिने, रोकड, मोबाइल लंपास

नाशिक : शेतीकाम सांगिल्याचा राग आल्याने मुलाने जन्मदात्याचा केला खून

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा वडिलांनी शेतात कामाला जाण्यास सांगितल्याचा राग आल्याने संतापाच्या भरात फावड्याने जन्मदात्याच्या डोक्यावर वार करुन खून केल्याच्या आरोपावरुन दिंडोरी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर संशयीत आरोपी फरार झाला आहे. नाशिक : हॉटेलमधून दोन बालकामगारांची सुटका याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहीती अशी की, दिंडोरी तालुक्यातील निगडोळ येथील साहेबराव मुरलीधर मालसाने …

The post नाशिक : शेतीकाम सांगिल्याचा राग आल्याने मुलाने जन्मदात्याचा केला खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतीकाम सांगिल्याचा राग आल्याने मुलाने जन्मदात्याचा केला खून

नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात लूटमार, मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगारास एम. पी. डी. ए. कायद्यानुसार मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. राहुल मच्छिंद्र पवार (२७, रा. गंगापूर गाव) असे स्थानबद्ध केलेल्या संशयिताचे नाव आहे. राहुल विरोधात गंगापूर, मुंबई नाका, पंचवटी व सरकारवाडा पोलिस ठाण्यात शस्त्रांचा धाक दाखवणे, जबरी चाेरी, मारहाण, खुनाचा प्रयत्न, लूटमार आदी गुन्हे …

The post नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सराईत गुन्हेगारला केले स्थानबद्ध

नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार नाशिक : वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना द्वारका परिसरात घडली. संतोष रामदास गादेकर (४०, रा. ओझर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून, विजय केसरी यादव (६२) हे जखमी झाले आहेत. पोलिसांच्या फिर्यादीनुसार, २३ मे रोजी रात्री ९.३० वाजता कारची धडक बसल्याने संतोष यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भद्रकाली …

The post नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक क्राईम : नांदूरगावात एकास मारहाण

नांदूरगावात एकास मारहाण नाशिक : वादाचे कारण विचारणाऱ्यास दोघांनी मिळून मारहाण केल्याची घटना नांदूरगाव येथील परफेक्ट कृषी मार्केटजवळील परिसरात घडली. या प्रकरणी शंकर गोवर्धन वाडेकर (३९, रा. नांदूरगाव) यांच्या फिर्यादीनुसार, आडगाव पोलिस ठाण्यात संशयित महेश शेडगे व अशोक शेडगे या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दोघा संशयितांनी २० मे रोजी सकाळी १०.३० वाजता शिवीगाळ करीत …

The post नाशिक क्राईम : नांदूरगावात एकास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : नांदूरगावात एकास मारहाण

नाशिक क्राईम : कोणार्कनगरला तरुणीचा विनयभंग

कोणार्कनगरला तरुणीचा विनयभंग नाशिक : कोणार्कनगर परिसरात एकाने तरुणीस अडवून तिला शिवीगाळ, दमदाटी करीत विनयभंग केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पीडितेने आडगाव पोलिस ठाण्यात संशयित लतेश अग्रवाल विरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे. संशयिताने २५ मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास विनयभंग केल्याचे पीडितेने सांगितले. जुना कथडा परिसरात घरफोडी नाशिक : जुना कथडा परिसरात चोरट्याने …

The post नाशिक क्राईम : कोणार्कनगरला तरुणीचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : कोणार्कनगरला तरुणीचा विनयभंग

नाशिक क्राईम : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा

नाशिक : पहिल्या मजल्यावरून पडल्याने ५५ वर्षीय बारकू शिवराम शेळके (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात सादिक अब्बास शेख (रा. शिवाजीनगर) व इतर जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर परिसरात एका शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून तेथे दि. १३ मे रोजी बारकू शेळके काम करत होते. त्यांच्या सुरक्षिततेची …

The post नाशिक क्राईम : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा

नाशिक : ‘खाकी’चे स्वप्न लवकरच साकार होणार; दिवंगतांच्या वारसांना मोठा दिलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळापासून शहर पोलिस आयुक्तालयाच्या रखडलेल्या अनुकंपांतर्गत पोलिस शिपाई भरतीचा मार्ग मोकळा झाला असून, सन 2020 ते 2022 या तीन वर्षांतील 27 उमेदवारांची यादी आस्थापना विभागाने जाहीर केली आहे. त्यामुळे अनुकंपा भरतीसाठी पात्र ठरणार्‍या दिवंगत पोलिस कर्मचार्‍यांच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयुक्तालयाने प्रतीक्षा सूची तयार केल्याने या वारसदारांचे ‘खाकी’चे स्वप्न …

The post नाशिक : ‘खाकी’चे स्वप्न लवकरच साकार होणार; दिवंगतांच्या वारसांना मोठा दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘खाकी’चे स्वप्न लवकरच साकार होणार; दिवंगतांच्या वारसांना मोठा दिलासा