पाणीटंचाईच्या झळा : पाण्यासाठी टँकरवारी; दररोज ५० फेऱ्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण भागापाठोपाठ नाशिक शहरातही पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. शहरातील जुने नाशिक, पंचवटी, सिडकोतील उंचसखल भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या तक्रारी आल्याने महापालिकेने या भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. सद्यस्थितीत शहरात दररोज टँकरच्या ५० फेऱ्या होत आहेत. गत पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणे भरली नाहीत. त्यातच मराठवाड्याकरिता नाशिक व …

The post पाणीटंचाईच्या झळा : पाण्यासाठी टँकरवारी; दररोज ५० फेऱ्या appeared first on पुढारी.

Continue Reading पाणीटंचाईच्या झळा : पाण्यासाठी टँकरवारी; दररोज ५० फेऱ्या

जायकवाडीच्या पाण्यावरून शासन बॅकफूटवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक आणि नगरमधून जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी स्थानिक पातळीवर तयारी जवळपास पूर्ण झाली असताना शासनाने अद्यापही विसर्गाचे आदेश दिलेले नाहीत. पाणी देण्याबाबत नाशिक व नगरमधून होणारा तीव्र विरोध आणि समन्यायी पाणी वाटपासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शासन बॅकफूटवर गेल्याची चर्चा आहे. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने तीन दिवसांपूर्वी जायकवाडीच्या उर्ध्व खाेऱ्यामधून एकूण ८.६०३ टीएमसी …

The post जायकवाडीच्या पाण्यावरून शासन बॅकफूटवर appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडीच्या पाण्यावरून शासन बॅकफूटवर

नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न पेटला

लासलगाव(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार मराठवाड्यातील पैठण येथील जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 15 ऑक्टोंबर च्या स्थितीत अनुसार 65 टक्क्याच्या  खाली असल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन असल्याने नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न आज पेटल्याचे चित्र निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या वक्रकार गेट समोर पाहायला मिळाले. भाजप नेत्या अमृता पवार यांच्या …

The post नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न पेटला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न पेटला

नाशिकमधून मराठवाड्याला सहा टीएमसी पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चालूवर्षी पावसाने दडी मारल्याने नाशिक जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यातच यंदा जिल्ह्यातून अवघे ६.१ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहचले आहे. दुष्काळी परिस्थिती बघता मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यातून अतिरिक्त पाण्याची मागणी होऊ शकते. त्यामूळे येत्याकाळात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होेताना नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा असा वाद पेटण्याची शक्यता आहे. …

The post नाशिकमधून मराठवाड्याला सहा टीएमसी पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधून मराठवाड्याला सहा टीएमसी पाणी

विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाड्याने हाहाकार; राज्यात सर्वाधिक तापमान या शहरात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शनिवारी सूर्याने अक्षरश: वैशाख वणवा पेटवला अन् हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद केली. भुसावळमध्ये राज्यात सर्वाधिक 45.9 अंश तापमान होते. अकोला 45.6, जळगाव 45, तर परभणी 44.7 अंशांवर गेले होते. दिवसभर भयंकर उकाड्याने राज्यातील नागरिक हैराण झाले. दरम्यान, ही लाट 15 मेपर्यंत कायम राहील, असा इशारा हवामान …

The post विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाड्याने हाहाकार; राज्यात सर्वाधिक तापमान या शहरात appeared first on पुढारी.

Continue Reading विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात उकाड्याने हाहाकार; राज्यात सर्वाधिक तापमान या शहरात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘नाशिक, नगर, मराठवाडा पाण्याचा वाद मिटवणार’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांत एकाही प्रकल्पाला मान्यता दिली नाही. त्याउलट गेल्या पाच महिन्यांत आमच्या सरकारने 24 हजार कोटींच्या 15 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. उरलेले 11 प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. त्यामध्ये नाशिक-नगर अन् मराठवाड्यात पाण्यावरून सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी आमचा कसोशीने प्रयत्न सुरू असून, येत्या वर्षअखेरपर्यंत हे काम मार्गी लागेल, असा विश्वास …

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘नाशिक, नगर, मराठवाडा पाण्याचा वाद मिटवणार’ appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘नाशिक, नगर, मराठवाडा पाण्याचा वाद मिटवणार’

दिवाळी वाटप करतानाच, गर्भवतीची प्रसूती करत दाखवले माणुसकीचे दर्शन

नाशिक (निफाड); पुढारी वृत्तसेवा  वनसगाव (ता.निफाड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. कलीम पठाण आणि आरोग्य अधिकारी दिवाळीनिमित्त आपल्या सहकाऱ्यांसोबत  वनसगाव-ब्राह्मणगाव रस्त्यावरील वस्त्यांवर कपडे, फराळ, आणि फटाके वाटत होते. यातच एका झोपडीत हे दिवाळीचे साहित्य द्यायला गेले असता, डॉ. पठाण यांनी दिपाली महाले (वय 24) या गरोदर महिलेला विव्हळताना पाहिले. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन करून याबद्दल …

The post दिवाळी वाटप करतानाच, गर्भवतीची प्रसूती करत दाखवले माणुसकीचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळी वाटप करतानाच, गर्भवतीची प्रसूती करत दाखवले माणुसकीचे दर्शन

नाशिक : जिल्हाभरातील 19 धरणांमधून विसर्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सद्यस्थितीत 24 प्रमुख धरणांमधील उपयुक्त साठा 93 टक्क्यांवर पोहोचला आहे. काश्यपी, गौतमी, नागासाक्या, पुनद व माणिकपुंज वगळता, उर्वरित 19 धरणांमधून विसर्ग केला जात आहे. पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेतली असली, तरी मागील संपूर्ण आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश भागाला झोडपून काढले आहे. त्यामुळे …

The post नाशिक : जिल्हाभरातील 19 धरणांमधून विसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हाभरातील 19 धरणांमधून विसर्ग

Jalgaon : हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. पाणी वेगाने वाहू लागल्याने हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. यामुळे दर सेकंदाला धरणातून २४ हजार ५०९ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. तापी नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या …

The post Jalgaon : हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : हतनूर धरणाचे २२ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले