मालेगाव : प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाने रोखलं अन् आमदाराचा चढला पारा

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा येथील महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना सुरक्षारक्षकाने रोखल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. गुरुवारी (दि.९) दुपारी हा प्रकार घडला. मालेगाव महानगरपालिकेत वारंवार होणाऱ्या आंदोलन आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सुरक्षारक्षक नियुक्त केले आहेत, परंतु त्यांची पद्धतच वादग्रस्त ठरु पाहत आहे. त्यात गुरुवारच्या घटनेने वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच धावपळ …

The post मालेगाव : प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाने रोखलं अन् आमदाराचा चढला पारा appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव : प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाने रोखलं अन् आमदाराचा चढला पारा

मालेगाव : घंटागाडी कामगारांचे मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन

 मालेगाव मध्य : (जि. नाशिक)  पुढारी वृत्तसेवा मालेगाव महानगरपालिकेत वॉटरगेस या खासगी ठेकेदारामार्फत काम करणार्‍या घंटागाडी कामगारांनी किमान वेतन व वेळोवेळी देण्यात येणारा महागाई भत्ता या प्रमाणे आठ तास कामाचे वेतन लागू करावे यासह इतर मागण्यांसाठी येथील महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर कचरा भरलेल्या घंटागाड्यांसह धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. मालेगाव …

The post मालेगाव : घंटागाडी कामगारांचे मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव : घंटागाडी कामगारांचे मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलन

मालेगाव मनपात लेखणी बंद आंदोलन, आयुक्तांवर दुषित पाणी फेकल्याचा निषेध

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा जुना आग्रा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी झालेल्या रास्ता रोको प्रसंगी मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्यावर दुषित पाणी फेकल्याचा प्रकार घडला होता. त्याच्या निषेधार्थ मनपातील अधिकारी कर्मचारी यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून लेखणी बंद आंदोलन केले. आंदोलनस्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने …

The post मालेगाव मनपात लेखणी बंद आंदोलन, आयुक्तांवर दुषित पाणी फेकल्याचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव मनपात लेखणी बंद आंदोलन, आयुक्तांवर दुषित पाणी फेकल्याचा निषेध

Nashik Malegaon : मालेगावी मनपाची प्रभाग एकमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मालेगाव महापालिकेने शुक्रवारी (दि.7) प्रभाग क्रमांक एकच्या कार्यक्षेत्रात धडक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून पक्क्या बांधकामांवर हातोडा मारला. काही दिवसांपूर्वी याच भागातील काही नागरिकांनी गटारकामाला अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांविरोधात आंदोलन केले होते. त्याची गंभीर दखल प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी घेतली. सर्व्हे नंबर 98 येथे भुयारी गटारीचे काम प्रस्तावित होते. मात्र त्याला …

The post Nashik Malegaon : मालेगावी मनपाची प्रभाग एकमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Malegaon : मालेगावी मनपाची प्रभाग एकमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम

मालेगावसह 9 महापालिकांची 5 ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर आणि नांदेड- वाघाळा या 9 महापालिकांच्या ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 5 ऑगस्ट रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत मंगळवारी आदेश दिले आहेत. यापूर्वी आयोगाने 14 महापालिकांच्या आरक्षणाचा कार्यक्रम घोषित केला होता. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती …

The post मालेगावसह 9 महापालिकांची 5 ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावसह 9 महापालिकांची 5 ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत

मालेगाव मनपाची अंतिम प्रारुप यादी प्रसिद्ध

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 19) बहुप्रतिक्षित अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली असली तरी, त्याविषयी दुसर्‍या दिवशीदेखील मालेगावकर अनभिज्ञच होेते. प्रारुप यादीवर 36 हरकती व सूचना दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन अखेर अंतिम प्रभागरचना निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि.19) प्रसिद्ध केली. मात्र, त्याविषयी मनपा वर्तुळदेखील अनभिज्ञच राहिले. मनपाच्या …

The post मालेगाव मनपाची अंतिम प्रारुप यादी प्रसिद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव मनपाची अंतिम प्रारुप यादी प्रसिद्ध