2 हजारांची लाच घेताना महिला लिपीक जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-महात्मा फुले महामंडळातील कनिष्ठ लिपीकास २ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. छाया विनायक पवार असे लाचखाेर लिपीकाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मुलाचे महामंडळाच्या वतीने व्यवसायासाठी २ लाख १६ हजार रुपयांच्या कर्ज मंजूर झाले आहे. मंजूर कर्जाचा धनादेश बँक खात्यात जमा करण्यासाठी पवार यांनी तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांच्या …

The post 2 हजारांची लाच घेताना महिला लिपीक जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading 2 हजारांची लाच घेताना महिला लिपीक जाळ्यात

‘बक्षीस’ ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ‘चहा-पाण्याचे काय?’, ‘टेबलाखालून द्यावे लागतात’, ‘साहेबाला द्यावे लागतात’, ‘समोरच्याला काही द्यावे लागेल’ असे शब्द म्हटले की, शासकीय लोकसेवक लाच मागत असल्याचे रूढ झाले आहे. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत या शब्दांमध्ये ‘बक्षीस’ शब्दाची भर पडली आहे. लाचखोरीच्या कारवाईतून वाचण्यासाठी काही महाभागांनी आम्ही लाच नव्हे, तर बक्षीस घेतले असा दावा केला. त्यामुळे …

The post 'बक्षीस' ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट appeared first on पुढारी.

Continue Reading ‘बक्षीस’ ही लाचच..! लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले स्पष्ट

नाशिक : सहायक पोलिस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या विजय नारायण शिंदे (51) या सहायक पोलीस उपनिरीक्षक , वर्ग 3, यास 3000 रुपये लाच स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणातील तक्रारदार यांच्या पत्नीने येवला तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या अदखलपात्र तक्रारीवरून कारवाई करण्यासाठी व तक्रारदार त्यांच्या विरुद्ध दाखल …

The post नाशिक : सहायक पोलिस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहायक पोलिस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात

नाशिक : दिंडाेरीत सहाशे रुपयांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक गजाआड

दिंडोरी : मृत्यू प्रमाणपत्र बनवून देण्याच्या मोबादल्यात सहाशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पिंपळनारे येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. शेवाडी येथील एका व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवक श्रावण वामन वाकचौरे (52, रा. नाशिक) याने सहाशे रुपयांची लाच मागितली हाेती. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर शुक्रवारी दुपारी वाकचौरे …

The post नाशिक : दिंडाेरीत सहाशे रुपयांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडाेरीत सहाशे रुपयांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक गजाआड

जळगाव : जात वैधता प्रमाणपत्रासाठी 10 लाखांची लाच, तिघे एसीबीच्या जाळ्यात

जळगाव :  जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी तब्बल १९ वर्षांपासून वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून आणि मुंबई उच्च न्यायालयाने अनुसुचित जमाती जात पडताळणी समितीला जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देणेसाठी दोन महिन्याचा कालावधी देवून तक्रारदार यांच्याकडून १० लाख रूपयांची लाचेची मागणी करणाऱ्या कनिष्ठ लिपीक, समिती सदस्यसह मध्यस्थी अशा तीन जणांवर जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. …

The post जळगाव : जात वैधता प्रमाणपत्रासाठी 10 लाखांची लाच, तिघे एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जात वैधता प्रमाणपत्रासाठी 10 लाखांची लाच, तिघे एसीबीच्या जाळ्यात

Nashik : लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात दुसरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने राज्यभरात झालेल्या लाचखोरांवरील कारवाईत राज्यात नाशिक दुसऱ्या स्थानी आले आहे. नाशिक परिक्षेत्रात वर्षभरात १२५ सापळ्यांमध्ये १७५ लाचखोर व्यक्तींना पकडण्यात आले असून, यात नऊ खासगी व्यक्ती आढळल्या आहेत. राज्यात सर्वाधिक कारवाई पुणे परिक्षेत्रात झाली असून, त्यात १५५ सापळ्यांमध्ये २२३ लाचखोर जाळ्यात सापडले आहेत. नाशिक परिक्षेत्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, …

The post Nashik : लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात दुसरे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात दुसरे

नाशिक : मनपाची महिला लिपिक 500 रुपयाची लाच घेताना जेरबंद

नाशिक : महानगरपालिकेच्या पश्चिम विभाग कार्यालयातील जन्म-मृत्यू विभागाच्या वरिष्ठ लिपिक प्रेमलता प्रेमचंद कदम (54) यांना आज 500 रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदाराच्या नातीचा जन्माचा दाखला तयार करून देण्याकरिता कदम यांनी 500 रुपये लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर पोलिस निरीक्षक साधना भोये बेलगावकर यांच्या पथकाने सापळा रचत कदम यांना कार्यालयातच …

The post नाशिक : मनपाची महिला लिपिक 500 रुपयाची लाच घेताना जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाची महिला लिपिक 500 रुपयाची लाच घेताना जेरबंद

धुळे : जवानांना ड्युटी लावण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणारा समादेशक गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा पोलीस दलाच्या खांद्यास खांदा लावून कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम करणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांना काम दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या तालुका समादेशकाला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकारामुळे गृहरक्षक दलाच्या जवानांना बंदोबस्ताचे काम देण्यातही भ्रष्टाचार होत असल्याचा प्रकार पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. गृहरक्षक दलाच्या जवानांना …

The post धुळे : जवानांना ड्युटी लावण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणारा समादेशक गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जवानांना ड्युटी लावण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणारा समादेशक गजाआड