धक्कादायक! नाशिकसारख्या शहरात ‘मेडिकल हब’ नावापुरतेच

केंद्र आणि राज्य शासनाकडून मातामृत्यू दर रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना नाशिकसारख्या ‘मेडिकल हब’ म्हणून नावारूपास आलेल्या शहरात गेल्या पाच वर्षांत तब्बल २९४ मातांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे मातांचा सर्वाधिक मृत्यू हा महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये झाला आहे. मृत मातांमध्ये बहुतांश शहरालगतच्या ग्रामीण भागातील आहेत. राज्यामध्ये मातामृत्यू दर रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या …

The post धक्कादायक! नाशिकसारख्या शहरात 'मेडिकल हब' नावापुरतेच appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक! नाशिकसारख्या शहरात ‘मेडिकल हब’ नावापुरतेच

गेल्या पाच वर्षांत नाशिकमध्ये अवघ्या आठ पुरुषांनी केली शस्त्रक्रिया

एकविसाव्या शतकातही खुळचट पुरुषी मानसिकता कायम असून, पुरुषप्रधान संस्कृती म्हणून मिरवणाऱ्या समाजात कुटुंब नियोजनाचा भार स्त्रियांवरच असल्याचे धक्कादायक वास्तव नाशिकसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत शहरातील केवळ आठ पुरुषांनी नसबंदी केली असून, पुरुष नसबंदीचे हे प्रमाण निर्धारित उद्दिष्टाच्या शून्य टक्के आहे. त्या तुलनेत तब्बल १० हजार …

The post गेल्या पाच वर्षांत नाशिकमध्ये अवघ्या आठ पुरुषांनी केली शस्त्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading गेल्या पाच वर्षांत नाशिकमध्ये अवघ्या आठ पुरुषांनी केली शस्त्रक्रिया

नाशिक : शहरातील ३२० सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सोनोग्राफी सेंटरच्या माध्यमातून गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान करण्याचे प्रकार थांबविण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील तब्बल ३२० सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी केली. प्रत्येक विभागात ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार समोर आला नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी …

The post नाशिक : शहरातील ३२० सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील ३२० सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी

नाशिक : मनपात 456 पदांची जम्बो भरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागापाठोपाठ वैद्यकीय विभागासाठीच्या सेवा प्रवेश नियमावलीला राज्याच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिल्याने वैद्यकीय विभागामार्फत सुरू असलेल्या 45 डॉक्टरांची मानधनावरील भरती प्रक्रिया रद्द केली आहे. त्याचबरोबर अग्निशमनच्या 208 फायरमन पदासोबतच वैद्यकीय विभागातील 81 डॉक्टरांच्या पदांसह 248 पदांसाठी कायमस्वरूपी भरती करण्याचा निर्णय घेतल्याने, नोव्हेंबरपासून महापालिकेत 456 पदांची जम्बो भरती मोहीम राबविली …

The post नाशिक : मनपात 456 पदांची जम्बो भरती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपात 456 पदांची जम्बो भरती

नाशिक : शहरात 130 जणांना स्वाइन फ्लू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराची तीव्रता वाढू लागल्याने मनपाचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. आतापर्यंत या आजाराने 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहरातील सहा, तर ग्रामीण भागातील चौघा रुग्णांचा समावेश असून, नगर जिल्ह्यातील पाच आणि पालघरमधील एकाचा नाशिकमध्ये उपचार घेताना मृत्यू झाला आहे. ऐन गणेशोत्सवात या आजाराचा प्रादुर्भाव …

The post नाशिक : शहरात 130 जणांना स्वाइन फ्लू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात 130 जणांना स्वाइन फ्लू