हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या संपर्कात? बडगुजर यांच्या दाव्याचा गोडसेंकडून इन्कार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून येऊनदेखील शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारीसाठी झगडावे लागत आहे. नाशिकमधून महायुतीकडून छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यामुळे गोडसे यांची अस्वस्थता वाढली असून, ते टोकाचा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. अशातच सिन्नरमधील मेळाव्यात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर …

The post हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या संपर्कात? बडगुजर यांच्या दाव्याचा गोडसेंकडून इन्कार appeared first on पुढारी.

Continue Reading हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या संपर्कात? बडगुजर यांच्या दाव्याचा गोडसेंकडून इन्कार

बडगुजरांपाठोपाठ भाजपच्या व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या समवेत डान्स पार्टी प्रकरणात शिवसेना-ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भाजपचा पदाधिकारी आणि सराईत गुन्हेगार व्यंकटेश मोरे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मोरेवर गुन्हा का नाही? असा सवाल ठाकरे गटासह विरोधकांकडून उपस्थित केला जात …

The post बडगुजरांपाठोपाठ भाजपच्या व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading बडगुजरांपाठोपाठ भाजपच्या व्यंकटेश मोरेवर गुन्हा दाखल

सुधाकर बडगुजरांना शनिवारपर्यंत अंतरिम जामीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नगरसेवक पदाचा गैरवापर करीत स्वत:च्या कंपनीला महापालिकेच्या माध्यमातून शासकीय कंत्राट मिळवून देत महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह इतर तिघांविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणूक व भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तिघांनाही शनिवार (दि. २०) पर्यंत अंतरीम अटकपुर्व जामीन मिळाला आहे. अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज प्रकरणी …

The post सुधाकर बडगुजरांना शनिवारपर्यंत अंतरिम जामीन appeared first on पुढारी.

Continue Reading सुधाकर बडगुजरांना शनिवारपर्यंत अंतरिम जामीन

सुधाकर बडगुजर यांना अंतरिम जामीन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक पदावर असतानाही स्वत:च्या कंपनीमार्फत मनपाचे कंत्राट घेत शासनाची फसवणूक करीत अपहार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी बडगुजर यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार बडगुजर यांना अटी-शर्तींच्या अधीन राहून न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर …

The post सुधाकर बडगुजर यांना अंतरिम जामीन appeared first on पुढारी.

Continue Reading सुधाकर बडगुजर यांना अंतरिम जामीन

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, तो व्हिडीओ..

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊतील कॅसिनोमधील व्हिडिओ लिक झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई केली गेली. पण, ही वस्तुस्थिती नाही. बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहेत. त्यांची शपथ घेऊन सांगतो की, त्या व्हिडिओचा बडगुजर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा काहीही संबंध नाही. संघ परिवार, विशेषत: नागपूरवाल्यांना व्हिडिओ कसा लिक झाला हे माहिती आहे, असा …

The post बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, तो व्हिडीओ.. appeared first on पुढारी.

Continue Reading बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, तो व्हिडीओ..

बडगुजर यांनीही मागविली ठरावांची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबतचे कथित पार्टी प्रकरण आणि नगरसेवक असूनही बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीसोबत केलेल्या कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केल्यामुळे अडचणीत आलेले ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी चौकशीला कायदेशीर उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बडगुजर यांनी स्थायी समितीतील २००७ ते २००९ या …

The post बडगुजर यांनीही मागविली ठरावांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading बडगुजर यांनीही मागविली ठरावांची माहिती

बडगुजरांच्या पार्टीत भाजप कार्यकर्त्याचाही डान्स

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सन १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत एका पार्टीत डान्स केल्याचा शिवसेना उबाठा गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. या पार्टीचे धागेदोरे शोधण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जात असून, या पार्टीत भाजपच्या माथाडी कामगार संघटनेचा शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे याचाही समावेश असल्याचे …

The post बडगुजरांच्या पार्टीत भाजप कार्यकर्त्याचाही डान्स appeared first on पुढारी.

Continue Reading बडगुजरांच्या पार्टीत भाजप कार्यकर्त्याचाही डान्स

सुधाकर बडगुजर यांचे कृत्य देशद्रोही : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाउद इब्राहिम याचा राइट हॅन्ड असलेल्या सलीम कुत्ताच्या सन्मानार्थ ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर पार्टी देतात. त्या पार्टीमधील डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बडगुजरांचे हे कृत्य देशद्रोही आहे, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. सलीम कुत्ताचे निधन झाले, असे म्हणणाऱ्यांची कीव येते, असा …

The post सुधाकर बडगुजर यांचे कृत्य देशद्रोही : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading सुधाकर बडगुजर यांचे कृत्य देशद्रोही : दादा भुसे

बडगुजर-सलीम कुत्ता पार्टी कुठे व कधी झाली याचा उलगडा

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या व्हिडीओमुळे चौकशीचा ससेमिरा लागलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची सहाव्यांदा चौकशी करण्यात आली. बडगुजर यांनी पोलिसांना अपेक्षित उत्तरे दिली नसली, तरी पोलिसांनी केलेल्या समांतर तपासात फार्महाऊसवरील ती पार्टी २४ मे २०१६ रोजी झाल्याचे समोर येत आहे. मे महिन्यातच सलीम कुत्ता याचा पॅरोल …

The post बडगुजर-सलीम कुत्ता पार्टी कुठे व कधी झाली याचा उलगडा appeared first on पुढारी.

Continue Reading बडगुजर-सलीम कुत्ता पार्टी कुठे व कधी झाली याचा उलगडा

सलीम कुत्ता पार्टी प्रकरणी व्हिडिओच्या तांत्रिक तपासावर भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत केलेल्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. मात्र चौकशीत ते अपेक्षित उत्तरे देत नसल्याने पोलिसांनी समांतर तपासास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जो व्हिडिओ समोर आला आहे, त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. दरम्यान, …

The post सलीम कुत्ता पार्टी प्रकरणी व्हिडिओच्या तांत्रिक तपासावर भर appeared first on पुढारी.

Continue Reading सलीम कुत्ता पार्टी प्रकरणी व्हिडिओच्या तांत्रिक तपासावर भर