नाशिक क्राइम : अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी राजेंद्र सुपेकर (३४, रा. नाईकवाडी, कालिकामाता मंदिरामागे, गंगापूररोड) हे दुचाकीने एबीबी सर्कलकडून महात्मानगरकडे जात होते. महात्मानगरजवळ झालेल्या अपघातात सुपेकर जखमी झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सुपेकर यांची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली …

The post नाशिक क्राइम : अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राइम : अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबडली

नाशिक : पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबडल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगिता साहेबराव बुटें (४२, रा. गोकुळ पार्क, पाथर्डी फाटा) ह्या रस्त्याने पायी जात होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी बुटें यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला प्रवाशाचे दागिने लांबविले नाशिक : …

The post नाशिक : पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबडली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पादचारी महिलेची सोनसाखळी ओरबडली

नाशिक : पिंपळगाव बसवंतला भरदिवसा सोनसा‌खळीचोरी

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजनगर परिसरात सेवानिवृत्त शिक्षिका सुशीला श्रीपतराव पाटील (७०, रा. छत्रपती शिवाजी महाराजनगर, पिंपळगाव बसवंत) यांच्या गळ्यातील ९६ हजार ६९० रुपये किमतीची तीन तोळ्याची सोन्याची पोत व पेंडंट खेचून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी धूम ठोकली. गुरुवारी (दि. 4) सकाळी 9 ला ही घटना घडल्याने पिंपळगाव बसवंत शहरात …

The post नाशिक : पिंपळगाव बसवंतला भरदिवसा सोनसा‌खळीचोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंपळगाव बसवंतला भरदिवसा सोनसा‌खळीचोरी

नाशिक : दागिन्यांवर आता महिला चोरट्यांची नजर

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा  सोनसाखळी चोरी (चेन स्नेचिंग) करणाऱ्या चोरट्यांनी सगळीकडे उपद्रव मांडलेला असतांनाच दुचाकीवरून येऊन महिलांचा पाठलाग करुन सोनसाखळी चोरण्याच्या कामात महिला चोरट्यांची देखील भर पडली आहे. आडगावच्या ज्ञानेश्वर सोसायटी परिसरातून पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या महिलेनेच ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. यात एक महिला चोर व एक पुरुष अशा …

The post नाशिक : दागिन्यांवर आता महिला चोरट्यांची नजर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दागिन्यांवर आता महिला चोरट्यांची नजर

जळगाव : यात्रोत्सवात शिक्षिकेची सोन्याची पोत लंपास

जळगाव : पुढारी वृत्तसेवा मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञाताने लांबवल्याची घटना धरणगाव शहरात घडली. याबाबत पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपा परिसरातील विविध अपघातांत तिघांचा मृत्यू धरणगाव शहरात मरीमाता मंदिर येथे यात्रोत्सव सुरू आहे. यात्रोत्सवात भाविकांची वर्दळ असून दर्शनासाठी महिलांसह भाविकांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या आहेत. या गर्दीचा फायदा घेत …

The post जळगाव : यात्रोत्सवात शिक्षिकेची सोन्याची पोत लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : यात्रोत्सवात शिक्षिकेची सोन्याची पोत लंपास