नाशिक : नांदूरशिंगोटेत दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटले रोखरक्कमेसह दोन तोळे सोने

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा वावी पोलिसांनी काही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यानंतरही नांदूरशिंगोटे परिसरात चोर्‍या, दरोड्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. नाशिक-नगर हद्दीवर निमोण रस्त्यालगत बुधवारी (दि.14) पहाटे तीनच्या सुमारास पुन्हा दरोडा पडला. आबा शेळके यांच्या वस्तीवर सहा सशस्त्र दरोडेखोरांनी धारदार चाकू व कटावणीचा धाक दाखवून दहा हजार रुपये रोख रकमेसह दोन तोळे दागिने चोरून नेले. …

The post नाशिक : नांदूरशिंगोटेत दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटले रोखरक्कमेसह दोन तोळे सोने appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदूरशिंगोटेत दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत लुटले रोखरक्कमेसह दोन तोळे सोने

जळगावात सीबीआयची छापेमारी; ज्वेलर्स, दोन वाहनासह शोरुममध्ये झाडाझडती

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव शहरातील ‘आरएल’ समूहाचे ज्वेलर्स शोरुम, दोन वाहन शोरुममध्ये सीबीआयने तपासणी केली. एसबीआयने ५२६ कोटींच्या थकीत कर्जाबाबत नवी दिल्ली येथे सीबीआय कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीवरून सीबीआयच्या ६० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने सर्व ठिकाणी एकाचवेळी ही कारवाई केली. आरएल‎ ज्वेलर्सचे संचालक ईश्वरलाल जैन यांना सर्च वॉरंट‎ दाखवून निवासस्थानात एका पथकाने सर्चिंगला सुरुवात‎ केली. …

The post जळगावात सीबीआयची छापेमारी; ज्वेलर्स, दोन वाहनासह शोरुममध्ये झाडाझडती appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात सीबीआयची छापेमारी; ज्वेलर्स, दोन वाहनासह शोरुममध्ये झाडाझडती

नाशिक : अवैध मद्य कारवाईचा आलेख वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या वर्षीच्या तुलनेने चालू आर्थिक वर्षात अवैध मद्यवाहतूक व साठा करणार्‍यांवर कारवाईचा आलेख वाढवला आहे. त्याचप्रमाणे जप्त केलेल्या मुद्देमालासोबत हजारहून संशयितांचीही धरपकड केली आहे. त्यामुळे अवैध मद्यसाठ्यासह त्यांचे वारस वाढल्याने परराज्यातून होणारी अवैध मद्यवाहतूक व विक्रीवर अंकुश लावण्याचे प्रयत्नही वाढले आहेत. नगर : सव्वा कोटींचा विदेशी मद्यसाठा …

The post नाशिक : अवैध मद्य कारवाईचा आलेख वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध मद्य कारवाईचा आलेख वाढला

जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पॅनकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली अज्ञाताने व्यापाऱ्याची २५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अभय सुभाष सांखला (४७, रा. मधुबन अपार्टमेंट, गजानन कॉलनी, जळगाव) हे व्यापारी आहेत. गुरुवारी (दि. ८) दुपारी ३ …

The post जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा

नाशिक : ‘त्या’ नराधामाच्या घरातून द्रोण बनविण्याचे साहित्य जप्त

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटी परिसरातील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात सात मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या संशयित हर्षल माेरेवर वेठबिगारी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपासाकामी त्याच्या द्रोण बनविणाऱ्या घराचा पंचनामा करत पोलिसांनी काही साहित्य जप्त केले आहे. तत्पूर्वी, पोलिसांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून संबंधित घर सील असल्याने त्यासाठी रितसर परवानगी मिळविली . …

The post नाशिक : ‘त्या’ नराधामाच्या घरातून द्रोण बनविण्याचे साहित्य जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ नराधामाच्या घरातून द्रोण बनविण्याचे साहित्य जप्त

धुळे : बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करणारा गुन्हेगार ताब्यात

धुळे : पुढारी वृत्तसेवा बनावट चावीच्या मदतीने वाहनांची चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले असून चोरट्याकडून  दोन पिकअप वाहने जप्त करण्यात आली आहेत. मालेगाव येथून चोरी केलेल्या पिकअप वाहनांची धुळे येथे विल्हेवाट लाावण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार …

The post धुळे : बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करणारा गुन्हेगार ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करणारा गुन्हेगार ताब्यात

नाशिक : गुन्ह्यात मदत केल्याच्या मोबदल्यात पोलिसाने घेतली दहा हजारांची लाच

नाशिक (घोटी/इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा घोटी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस नाईक रविराज जगताप (37) यांनी गुन्ह्यात मदत केल्या प्रकरणात 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष रंगेहाथ पकडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैठण : टेबलाखालून पैसे घेणे पडले महागात ; दस्त नक्कल देण्यासाठी लाच घेणाऱ्यावर कारवाई यातील तक्रारदाराच्या नातेवाइकांविरुद्ध घोटी पोलिस ठाण्यात …

The post नाशिक : गुन्ह्यात मदत केल्याच्या मोबदल्यात पोलिसाने घेतली दहा हजारांची लाच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुन्ह्यात मदत केल्याच्या मोबदल्यात पोलिसाने घेतली दहा हजारांची लाच

जळगाव : डीडीआर कार्यालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई करत एका कर्मचार्‍यास लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले आहे. यावल तालुक्यातील तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार तक्रारदाराविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल होवू न देण्यासाठी तसेच प्रकरणाच्या प्रती देण्यासाठी व नाशिकच्या अपिलात मदत करण्यासाठी १० हजारांची मागणी करून ती स्वीकारणार्‍या जळगाव सहकार निबंधक …

The post जळगाव : डीडीआर कार्यालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : डीडीआर कार्यालयातील अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : मुक्ताईनगरात बंदुकीच्या धाकावर तरूणाची लूट; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव (मुक्ताईनगर) : पुढारी वृत्तसेवा गुजरात राज्यातील एका दुकानदाराची औषध देण्याचा बहाणा करून लुटमार झाल्याची घटना घडली आहे. व्यापाऱ्याला घरी बोलावून चाकू, बंदूक आणि काठ्यांचा धाक दाखवत १० ते १२ जणांनी दीड लाखांची रोकड, मोबाईल, सोन्याची चैन असा एकुण २ लाख ५९ हजार ५९९ रूपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. …

The post जळगाव : मुक्ताईनगरात बंदुकीच्या धाकावर तरूणाची लूट; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरात बंदुकीच्या धाकावर तरूणाची लूट; १५ जणांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्याला बेड्या

नाशिक (मनमाड) : रईस शेख मनमाडला नऊ वर्षाचा लोकेश सोनवणे या चिमुकल्याचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केले असून राहुल उर्फ सोन्या पवार असे या नराधमचे नाव आहे. लोकेश त्याच्या घराजवळ खेळत असताना खाऊचे अमिष दाखवून आरोपीने त्याला निर्जनस्थळी नेले. त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर त्याचा निर्घृणपणे खून केल्याचे आरोपीने पोलिसांकडे कबुलीजबाब दिला. …

The post नाशिक : अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्याला बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अल्पवयीन मुलावर अत्याचार करून खून करणाऱ्याला बेड्या