खून करून रचला मजुराच्या अपघाताचा बनाव
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- निर्माणाधीन इमारतीत काम करत असताना पाय घसरून पडल्याने डोक्यास गंभीर मार लागल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची नोंद आडगाव पोलिस ठाण्यात होती. मात्र, मृत मजुराच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ठेकेदाराने आर्थिक कारणावरून डोक्यात लाकडी दांडा मारून खून केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आडगाव पोलिस ठाण्यात ठेकेदाराविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यास अटक …