..तर आमच्याइतके नालायक आम्हीच: आ. कोकाटे यांचे प्रत्युत्तर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील महायुतीचे अनेक आमदार महाविकास आघाडीकडे जाण्यास इच्छूक असल्याच्या चर्चांना राज्यभरात उत आला होता. यामध्ये “अजित पवारांना सोडून गेलो तर आमच्या इतके नालायक आम्हीच असू…. ” तसेच आमच्या पैकी कोणीच अजित पवारांना सोडून जाणार नसल्याचा दावा आमदार माणिकराव कोकाटे यांनी केला आहे. राज्यात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला १८ …

Continue Reading ..तर आमच्याइतके नालायक आम्हीच: आ. कोकाटे यांचे प्रत्युत्तर

नाशिक, इगतपुरी: वाढलेल्या मतांचा टक्का वाजे यांच्या पारड्यात

यंदाच्या लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीत आदिवासी बहुल मतदारसंघ असलेल्या इगतपुरी- त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात ७२ टक्क्यांच्या वर मतदान झाले. गतवेळेस हा आकडा केवळ ५८ टक्क्यांवर पोहोचला होता. यंदा वाढलेला टक्का हा महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पारड्यात टाकले. वाजे यांना इगतपुरी मतदारसंघातून १ लाख १५ हजार ८५, तर हेमंत गोडसे यांना ५८ हजार ५२ इतके मतदान …

Continue Reading नाशिक, इगतपुरी: वाढलेल्या मतांचा टक्का वाजे यांच्या पारड्यात

सिन्नर मतदारसंघातील मताधिक्य तोडताना गोडसे यांची दमछाक

सिन्नरच्या वाजे घराण्याला प्रगल्भ राजकीय वारसा लाभलेला आहे. राजाभाऊ वाजे यांचे आजोबा स्वतंत्र महाराष्ट्रात सिन्नरचे पहिले आमदार ठरले स्व, शंकरशेठ बाळाजी वाजे, त्यांची चुलत आजी पहिल्या महिला आमदार राहिल्या स्व. रुख्मिणीबाई विठ्ठलराव वाजे. आणि राजाभाऊ यांच्या आजी स्व. मथुराबाई शंकरराव वाजे यांनी पहिल्या महिला नगराध्यक्ष म्हणून इतिहासाच्या पानांत नाव कोरलेले आहे. हाच प्रगल्भ वारसा घेऊन …

Continue Reading सिन्नर मतदारसंघातील मताधिक्य तोडताना गोडसे यांची दमछाक

मविआला मराठा-ओबीसींचे बळ; महायुतीला दलित-मुस्लिमांची झळ

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात आरक्षणाचा नव्याने लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांचा प्रभाव अनेक बड्या नेत्यांना पराभवाची धूळ चारणारा ठरला. विशेषत: मराठवाड्यात हा प्रभाव प्रकर्षाने दिसून आला. जरांगे-पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जीवाची बाजी लावत असतानाच, मंत्री छगन भुजबळांनी ओबीसीसाठी अभेद्य भिंत उभी करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे राज्यातील प्रत्येक बडा नेता जरांगे-पाटील यांच्यापासून सावध भूमिका घेत …

Continue Reading मविआला मराठा-ओबीसींचे बळ; महायुतीला दलित-मुस्लिमांची झळ

नाशिक शहरभर झळकले ‘खासदार वाजें’चे बॅनर्स

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे यांचा विजय दृष्टिपथात येताच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून ‘खासदार’ असा उल्लेख असलेले वाजे यांच्या स्वागताचे, अभिनंदनाचे बॅनर्स शहरभर झळकले. लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी (दि. 4) अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात पार पडली. पहिल्या फेरीपासून वाजे यांनी घेतलेली मतांची आघाडी शेवटच्या ३०व्या फेरीपर्यंत कायम राहिली. अगदी …

Continue Reading नाशिक शहरभर झळकले ‘खासदार वाजें’चे बॅनर्स

नाशिकमध्ये पेटली ‘मशाल’ तर दिंडोरीत ‘तुतारी’ निनादली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – उत्तर महाराष्ट्राच्या कक्षेत येणाऱ्या सहा लोकसभा क्षेत्रांचे समतल वाटप करीत जनता जनार्दनाने महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी तीन जागा पारड्यात टाकल्या आहेत. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांनी विजयी मशाल पेटवली, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी दिंडोरीत तुतारीचा निनाद करून जायंट किलरचा किताब मिळवला. माजी केंद्रीय …

Continue Reading नाशिकमध्ये पेटली ‘मशाल’ तर दिंडोरीत ‘तुतारी’ निनादली

नाशिक : वस्तुस्थितीशी फारकत घेतल्यानेच उलटफेर! 

सत्तेची फळं चाखायला एकत्र येताना मतभेदाच्या भिंती गाडण्याचे दातृत्व दाखवण्यात राजकारणी कसूर सोडत नाहीत. तथापि, हा समझोता करताना जनभावना पायदळी तुडवण्याचा प्रमाद करण्याची किंमत चुकवावीच लागते. लोकसभा निवडणुकीत अशाच प्रमादाच्या शिडीवर चढून पुन्हा सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या महायुती नेत्यांना जमिनीवर आणण्याचे काम मतदारराजाने केले. महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस आणि उत्तर महाराष्ट्रात सर्व सहा जागांचा ढोल वाजवणाऱ्या महायुतीला …

Continue Reading नाशिक : वस्तुस्थितीशी फारकत घेतल्यानेच उलटफेर! 

शांतिगिरी महाराज, करण गायकरांना अनामत रक्कमही वाचविता आली नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशात मोदींची ओसरलेली लाट आणि इंडिया आघाडीचा वाढता प्रभाव नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातही चांगलाच दिसून आला. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा मविआतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ (पराग) वाजे यांनी तब्बल १ लाख ६२ हजार १ मतांच्या फरकाने पराभव केला. तर दिंडोरीत भाजपच्या विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती …

Continue Reading शांतिगिरी महाराज, करण गायकरांना अनामत रक्कमही वाचविता आली नाही

उत्तर महाराष्ट्रात महायुती ‘बॅकफुट’वर

उत्तर महाराष्ट्रात गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत क्लीन स्वीप करणाऱ्या भाजप युतीला यावेळी महाविकास आघाडीने चांगलाच दणका देत सहापैकी तीन जागा पटकावल्या. दर फेर मतमोजणीमुळे धुळे मतदारसंघाचा निकाल रखडला आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, डॉ. हीना गावित आणि हेमंत गोडसे या विद्यमान सदस्यांना पराभवाचा धका बसला आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, दिंडोरीत राष्ट्रवादी शरद पवार …

Continue Reading उत्तर महाराष्ट्रात महायुती ‘बॅकफुट’वर

“आया रे राजा लोगो रे लोगो”! निकालापूर्वीच विजयाचा जल्लोष पहा फोटो …

Nashik Lok Sabha Election Results 2024 Live | “आया रे राजा लोगो रे लोगो”! निकालापूर्वीच राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचा जल्लोष पहा फोटो … (सर्व छायाचित्रे – हेमंत घोरपडे) 14 वी फेरीत अखेर राजाभाऊ वाजे हे 147012 मतांनी आघाडीवर असल्याने राजाभाऊ वाजे यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघातून विजय निश्चित मानला जात असून नाशिककरांनी निष्ठेचा फळ दिल्याचे राजाभाऊ …

Continue Reading “आया रे राजा लोगो रे लोगो”! निकालापूर्वीच विजयाचा जल्लोष पहा फोटो …