हरिहर किल्ल्यावर गर्दीचा पूर; गडावर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
त्र्यंबकेश्वर (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – पावसाळी वातावरण अन् हिरवाईने नटलेल्या हरिहर किल्ल्यावर रविवारी सुटीची पर्वणी साधत हजारो पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. त्यामुळे किल्यावर गर्दीचा पूर आल्याचे चित्र दिवसभर होते. विशेष म्हणजे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांची गैरसोय झाली. या ठिकाणी गर्दी वाढत असतानाही वनविभागाकडून सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने पर्यटकांच्या …