जानोरीत बिबट्याचा वासरावर हल्ला

जानोरी : येथील मोहाडी रस्त्यालगत बिबट्याने वासरावर हल्ला केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. डी वाय चारीलगत अरुण ज्ञानदेव घुमरे यांचे शेतात घर आहे. रात्रीच्या सुमारास त्यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला. इतर जनावरांनी हंबरडा फोडण्यास सुरुवात केल्याने घुमरे हे घराबाहेर आले, तर त्यांना बिबट्याने वासरावर हल्ला केल्याचे दिसले. त्यांनी हातात बांबू घेऊन बिबट्याला पळवून लावले. …

The post जानोरीत बिबट्याचा वासरावर हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading जानोरीत बिबट्याचा वासरावर हल्ला

भरदिवसा बिबट्याचा थरार, शेतकऱ्यावर हल्ला

निफाड (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – येथून जवळच असलेल्या नांदुर्डी गावात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यावर भर दिवसा बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने या शेतकऱ्याच्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला पलायन करणे भाग पाडले. नंतर हा बिबट्या जवळच्या नारळाच्या झाडावर चढून बसला होता. शेतकऱ्यांनी आरडा ओरड केल्यानंतर बिबटया मकाच्या शेतात पळून गेला. (Nashik Leopard Attack) …

The post भरदिवसा बिबट्याचा थरार, शेतकऱ्यावर हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading भरदिवसा बिबट्याचा थरार, शेतकऱ्यावर हल्ला

नायगव्हाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्यांचा मृत्यू

नगरसुल(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा; येवला तालुक्यातील नायगव्हाण येथील सरपंच सुनील साळवे यांच्या वस्तीवर आज  (दि.६) पहाटे ४:०० वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यामध्ये शेडवरून उडी मारून बिबट्याने ४ शेळ्यांचा शेडमध्येच जाग्यावर फडशा पाडला आणि एक शेळी जवळील शेतात नेऊन खाल्ली आहे. संबंधित सुर्यभान गुळचंद साळवे या शेतकऱ्याचे सुमारे एक लाखाहुन अधिक नुकसान झाले आहे. यावेळी …

The post नायगव्हाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नायगव्हाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्यांचा मृत्यू

कोराटेत तरुणावर बिबट्याचा हल्ला 

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील कोराटे येल कदम या तरुणावर बिबट्याने हल्ला करून त्याला जखमी केले. गुरुवारी (दि.२१) सकाळी ६.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेने वाघनाल्यामध्ये बिबट्याचे वास्तव्य नजरेस पडले आहे. त्याने दोन दिवसांपूर्वीच सह्याद्री कंपनीत जाणाऱ्या तरुणावर हल्ला चढवला होता. नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकत तरुण बचावला होता. त्यानंतर गुरुवारी पुन्हा विष्णू शिंदे …

The post कोराटेत तरुणावर बिबट्याचा हल्ला  appeared first on पुढारी.

Continue Reading कोराटेत तरुणावर बिबट्याचा हल्ला 

पठ्याने, शौच्याच्या बादलीने दोन बिबट्यांना हुसकावले

‘बिबट्या’ नाव जरी उचारले तरी अंगावर काटा येतो. पण अवघ्या नऊ वर्षाच्या अभिषेकने तब्बल दोन बिबट्यांना चक्क शौच्याच्या बादलीने हुसकावून लावले. यावेळी एका बिबट्याने त्याच्यावर हल्लाही केला. दुसरा बिबट्याही अंगावर चालून आला. यात त्याच्या शरिराच्या पृष्ठभागाला बिबट्याचे नख लागल्याने, मोठी जखमही झाली. मात्र, किंचितही न डगमगता त्याने शौच्याच्या बादलीने दोन्ही बिबट्यांचा हल्ला परतवून लावला. अभिषेकच्या …

The post पठ्याने, शौच्याच्या बादलीने दोन बिबट्यांना हुसकावले appeared first on पुढारी.

Continue Reading पठ्याने, शौच्याच्या बादलीने दोन बिबट्यांना हुसकावले

प्रसंगावधान राखत मुलाने परतवला बिबट्याचा हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शौचास गेलेल्या नऊ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला चढवला, असे अनपेक्षित संकट ओढवले असतानाही बिथरुन न जाता त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानाने हल्लेखोर बिबट्यासह जवळच दबा धरुन बसलेल्या दुसऱ्या बिबट्याने ही धूम ठोकली. ही थरकाप उडविणारी घटना पिंपळगाव खांब येथे रविवारी (दि.१०) घडली. अभिषेक सोमनाथ चारसकर असे धाडसी मुलाचे नाव असून, त्याला नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात …

The post प्रसंगावधान राखत मुलाने परतवला बिबट्याचा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading प्रसंगावधान राखत मुलाने परतवला बिबट्याचा हल्ला

बिबट्यांच्या जोडीचा शेतकरी भावंडावर हल्ला, दोघेही जखमी

सिन्नर(जि. नाशिक) पुढारी : वृत्तसेवा दोन शेतकरी भांवडांवर एकाचवेळी दोन बिबट्यांनी हल्ला केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे घडली आहे. यात दोघेही भाऊ जखमी झाले असून उपचार घेण्यात आले आहेत. (Nashik Leopard Attack) तालुक्यातील नायगाव येथे चव्हाण वस्तीवर शेतकरी विलास लोणकर (39) व त्यांचे बंधू  सुभाष लोणकर (41) रात्री साडे वाजेच्या दरम्यान मोटरसायकल वर येत …

The post बिबट्यांच्या जोडीचा शेतकरी भावंडावर हल्ला, दोघेही जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading बिबट्यांच्या जोडीचा शेतकरी भावंडावर हल्ला, दोघेही जखमी

Nashik Leopard Attack : शेतात गवत कापत असताना युवकावर बिबट्याची झडप

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मुकणे-मुंढेगाव शिवहद्दीवरील मुकणे गायकुरणालगतच्या शेतात गवत कापत असलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला (Nashik Leopard Attack) करत जखमी केल्याची घटना घडली. यामुळे मुकणे गावकऱ्यांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुकणे येथील प्रकाश बोराडे हा युवक दुपारी 4 च्यादरम्यान जनावरांसाठी गवत कापायला मुकणे-मुंढेगाव शिवहद्दीवरील मुकणे गायकुरणालगत शेतावर गेला होता. गवत कापत …

The post Nashik Leopard Attack : शेतात गवत कापत असताना युवकावर बिबट्याची झडप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Leopard Attack : शेतात गवत कापत असताना युवकावर बिबट्याची झडप