शिक्षक निवडणुकीत ही 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

नाशिक : पुढारी ऑनलाइन – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान (दि. 26) जून होणार आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे निवडणूक आयोगाने कळविले आहे. हे …

नाशिक शिक्षक’ची तिरंगी लढत चौरंगीच्या दिशेने

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येत्या २६ जून रोजी होत असलेल्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्ण ताकद पणाला लावली आहे. ५५ तालुक्यांचा अंतर्भाव असलेल्या या मोठ्या मतदारसंघात जवळपास ६४ हजार शिक्षक मतदार आहेत. त्यांना आपलेसे करताना प्रचाराचा अजेंडा प्रत्येक पक्षाचा सारखाच दिसत आहे. नाशिकमध्ये ही लढत सुरुवातीला तिरंगी वाटत होती, …

नाशिक : ‘शिक्षक’साठी प्रशासनाची जुळवाजुळव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीचे सूप वाजल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकीत येत्या २६ तारखेला मतदान होणार आहे. त्यादृष्टीने मतदान केंद्र निश्चित करण्यासह कर्मचारी नियुक्ती, मतदान साहित्याची जुळवाजुळव करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आले. त्यानंतर नूतन खासदार आणि त्यांचे समर्थक आनंदोत्सव साजरा …

शिक्षक निवडणुकीतील प्रमुख उमेदवार करोडपती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज सादर केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच विद्यमान आमदार किशोर दराडे यांचे नामसाधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांच्या नावाची चर्चा वाढली आहे. या उमेदवाराला विद्यमान आमदार दराडेंच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचे समोर आले होते. त्यामुळे राज्यभर हा विषय गाजला आहे. अद्याप तरी त्यांचा ठावठिकाणा लागला नसला तरी, …

अपक्ष दराडे अद्याप गायब; कुटुंबीय करणार आज तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – विधान परिषद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी अर्ज भरल्यानंतर नामसाधर्म्य असल्याने विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पोलिस संरक्षणात त्यांना नाशिक रोड पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. नंतर ते गायब झाले असून, त्यांचे अपहरण झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी …

शिक्षक मतदारसंघ निवडणूक: माघारीबाबत उत्सुकता वाढली

नाशिक: पुढारी वृत्तसेवा – विधानपरिषद शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार आहे. त्याची अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी (दि ७) रोजी संपल्यानंतर आता माघारीबाबत उत्सुकता वाढली आहे. आज (दि. १)) अर्जांची छाननी विभागीय आयुक्त कार्यालयात होणार असून त्यानंतर बाद अर्जांची संख्या विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे जाहीर करण्यात येणार आहे. एकूण ५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून …

निवडणूक शिक्षक आमदाराची; चर्चा राजकीय पक्षांची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषदेवर शिक्षक प्रतिनिधी असावा, यासाठी विधान परिषदेच्या एकूण संख्येच्या १/१२ प्रतिनिधी शिक्षक मतदारसंघातून निवडलेला असावा, अशी तरतूद संविधानात आहे. मात्र, सध्या या निवडणुकीमध्ये संस्थाचालक, राजकारणी उतरले असून, नाशिक विभागातून तब्बल ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये १४ अर्ज राजकीय पक्षांच्या एबी फॉर्मसह, तर ३९ अर्ज …

शिक्षक निवडणुकीतही पुन्हा नाशिकचा ‘डमी पॅटर्न’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिंडोरी मतदारसंघामध्ये विजयी उमेदवार भास्कर भगरेंची लाखभर मते बाबू भगरे यांनी केवळ नामसाध्यर्म्यामुळे मिळ‌वली होती. हे प्रकरण ताजे असतानाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये नामसाधर्म्यचा भगरे पॅटर्न बघायला मिळत आहे. उमेदवार किशोर दराडे, संदीप गुळवे यांना इतर उमेदवारांबरोबरच नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांशीही लढत द्यावी लागण्याची शक्यता आहे. शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज …

शिक्षक मतदारसंघातील अपक्ष किशोर दराडे यांच्या अपहरणाची चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उभे असलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांचे नामसाधर्म्य असलेले अपक्ष किशोर दराडे यांचे अपहरण झाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी झालेल्या हाय व्होल्टेज ड्रामानंतर रात्रीच्या सुमारास त्यांचे अपहरण झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पोलिसांकडे कुठलीही माहिती नसून, नातेवाइकदेखील त्यांच्या ठावठिकाणाबाबत अनभिज्ञ …

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठा बदल

नाशिक पुढारी ऑनलाइन – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीच्या मतदानाची वेळ याआधी सकाळी 8 ते दु.4.00 वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. परंतू ह्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मतदानाची सुधारित वेळ सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंतची निश्चित करण्यात आली आहे, असे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी …