Chain snatching : नाशिकमध्ये चोरट्यांच्या टार्गेटवर वृद्ध महिला

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी वृद्धांना लक्ष करीत त्यांच्याकडील सोन्याच्या पोती ओरबाडून (Chain snatching) पळ काढले आहेत. या प्रकरणी पंचवटी व इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत.

पहिल्या घटनेत आशा उमेश कराड (65, रा. हनुमानवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या हनुमानवाडी परिसरातील श्री महालक्ष्मी किराणा दुकानात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने दुकानात येऊन साबण मागितला. त्यानुसार आशा या साबण देण्यासाठी काउंटरजवळ आल्या असत्या चोरट्याने आशा यांच्या गळ्यातील पोत ओरबाडून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Chain snatching)

तर सुमन दत्तात्रय चव्हाण (70, रा. इंदिरानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या बुधवारी (दि. 12) सकाळी घराजवळून फुले व भाजीपाला घेऊन घरी परतत होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी सुमन यांना आवाज देत लक्ष विचलित करीत सुमन यांच्याकडील 60 हजार रुपयांची 32 ग्रॅम वजनाची पोत ओरबाडून नेली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post Chain snatching : नाशिकमध्ये चोरट्यांच्या टार्गेटवर वृद्ध महिला appeared first on पुढारी.