Chandrakant Patil : संजय राऊत आणि भाजपचे बडे नेते एकत्र, पाहा काय म्हणाले चंद्रकांत पाटील…

<p>संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस, सध्याच्या राजकीय गणितांनुसार राजकारणातले एकमेकांचे वैरी... पण हेच राजकीय वैरी नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलीच्या लग्नात एकत्र आले... आणि एकमेकांचा हात सोडायलाही तयार नव्हते... अगदी गळ्यात गळे घालून संजय राऊत आणि प्रवीण दरेकर गप्पा मारत होते, तर इतर वेळी संजय राऊतांना आव्हान देणारे चंद्रकांत पाटील हे मात्र अगदी राऊतांच्या बाजूला बसले होते... तर दुसरी शिवसेना भवन फोडू म्हणणारे भाजप नेते प्रसाद लाडही यावेळी संजय राऊत आणि फडणवीसांच्या गप्पा गोष्टींवर दिलखुलास हसत होते.त्यामुळे राजकीय आखाड्यात कुस्ती खेळणाऱ्या या दिग्गजांनी आखाड्याबाहेर मात्र दोस्ती कायम ठेवलीय. पाहुयात काय म्हणाले चंद्रकांत पाटील याबाबत...</p>