Congress Igatpuri : इगतपुरीत आजपासून तीन दिवस काँग्रेसचं शिबीर, निवडणुकीची रणनीती ठरणार

<p>इगतपुरीतल्या थंड वातावरणात राज्यातले काँग्रेस नेते आजपासून तीन दिवस निवडणूक रणनीतीवर चर्चा करणार आहेत. सकाळी 11 वाजता काँग्रेसच्या या शिबिराला सुरुवात होणार आहे. स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसची आगामी निवडणुकीत काय रणनीती असेल याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. 106 नगरपंचायतींच्या निकालांचं विश्लेषणही यावेळी घेतलं जाईल. आगामी निवडणुकीत काँग्रेस स्वबळाचा हट्ट कायम ठेवणार की राष्ट्रवादी, शिवसेनेशी आघाडी करण्याचा निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष असेल.</p>