Corona Fighter : कोरोनाबाधितांचे कपडे धुणारा ‘अवलिया’! कौतुकाची थाप देत कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित

सिडको (जि.नाशिक) : कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत प्रत्येकजण आपापल्या परीने मदतीची भूमिका ठेवत कार्य करत असल्याचे दिसून येत आहे. त्यात असाच एक अवलिया कोरोनाबाधित रुग्णांचे कपडे धुण्याचे समाजकार्य करत आहे. त्यांचे सर्वच क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.

समाजकार्याची जाणीव ठेवणारा कोरोनायोध्दा

इंजि. चेतन भामरे हे लॉन्ड्रीचा व्यवसाय करतात. भामरे हे मूळचे सटाणा तालुक्यातील नामपूरचे रहिवासी असून, त्यांनी शिक्षण के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. आजोबाच्या निधनानंतर वडिलांनी साईयोग पॉवर लॉन्ड्री व्यवसाय सुरू ठेवला. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आपला परंपरागत व्यवसाय चालविण्याचे ठरविले. आज ते आपल्या सभोवतालच्या परिसरातील कोविड रुग्णालयातील रुग्णांचे कपड्याचे लॉन्ड्रीचे काम त्यांनी मोठ्या कुशलतेने मिळविले. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यश संपादन केले. त्यांनी सामाजिक जाणीव ठेवून कोरोना महामारीत देखील जनसेवा करत ३७ कोविड हॉस्पिटलची सर्व लॉन्ड्रीची कामे ते करीत आहेत.

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

अत्याधुनिक टेक्नॉलॉजीची यंत्रणा सामग्री

हे सर्व काम करण्यासाठी विविध प्रकारच्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीची यंत्रणा सामग्रीदेखील त्यांनी उभारली आहे. सर्व ब्रँडेड वॉशिंग पावडर आणि केमिकलचा वापर करून कपडे धुतले जातात. या सर्व समाजकार्यात त्यांना आपल्या सहकाऱ्यांची देखील मदत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. भामरे हे जे काम करत आहे त्यांचा समाजाप्रति जो वसा चालवत आहे, हे कौतुकास्पद आहे. 

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ 

आमदार सीमा हिरे यांच्या दृष्टीपथास सदर व्यक्ती आल्यानंतर त्यांनी आस्थेने विचारपूस करून कौतुकाची थाप देत त्याला कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित केले.