नाशिक : जिल्ह्यात कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेल्या रूग्णांच्या संख्येने एक लाखांचा आकडा सोमवारी (ता.१४) ओलांडला आहे. आतापर्यंत १ लाख २३८ रूग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. यापैकी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ३६ हजार ९७० रूग्ण बरे झाले होते. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर ९४.९५ टक्के राहिला आहे.
२९ मार्चला जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित आढळल्यानंतर ह्याच रूग्णाने प्रथम कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. यानंतर कोरोना बाधित आढळत असतांना, कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्यादेखील सातत्याने वाढत गेली. नव्याने आढळणाऱ्या रूग्ण संख्येने उच्चांक गाठलेल्या कालावधीतच दर दिवशी बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या दोन हजारहून अधिकवर पोहोचली होती. आता कोरोनामुक्त रूग्णांची संख्या १ लाखाहून अधिक झाली असून, सद्यस्थितीत ३ हजार ४६७ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा
२९ जुलैला बरे झालेल्या रूग्णांची संख्या दहा हजाराहून अधिक झाली होती. यानंतर बरे झालेल्या रूग्णांचा वीस हजारांचा टप्पा १८ ऑगस्टला, तीस हजारांचा टप्पा १ सप्टेंबरला, ४० हजारांचा टप्पा १२ सप्टेंबरला, पन्नास हजारांचा टप्पा १९ सप्टेंबरला, साठ हजारांचा टप्पा २४ सप्टेंबरला, सत्तर हजारांचा टप्पा ५ ऑक्टोबरला, ऐंशी हजारांचा १७ ऑक्टोबरला, नव्वद हजारांचा टप्पा ५ नोव्हेंबरला गाठला होता.
दिवसभरात २३७ बाधित, बरे झाले २७९ रूग्ण, तीन मृत्यू
सोमवारी (ता.१४) दिवसभरात २३७ रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर २७९ रूग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. तीन रूग्णांचा जिल्ह्यात मृत्यू झाला. यातून ॲक्टीव्ह रूग्ण संख्येत ४५ ने घट झालेली आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना बाधितांपैकी १८१ बाधित शहरातील, ४६ नाशिक ग्रामीणमधील, पाच मालेगावचे तर जिल्हाबाहेरील पाच रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. बरे झालेल्या रूग्णांमध्ये नाशिक शहरातील १३२, नाशिक ग्रामीणमधील १४३, जिल्हाबाहेरील चार रूग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तीन मृतांमध्ये शहरातील एक आणि ग्रामीण भागातील दोन रूग्णांचा समावेश आहे. यातून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १ लाख ५ हजार ५७२ झाली आहे. १ हजार ८६७ रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिवसभरात दाखल रूग्णांमध्ये नाशिक महापालिका रूग्णालये व गृहविलगीकरणात ७५५, नाशिक ग्रामीण रूग्णालये व गृहविलगीकरणात ४७, मालेगावला चार, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात आठ, जिल्हा रूग्णालयात चार रूग्ण दाखल झाले. ८०७ रूग्णांचे अहवाल सायंकाळी उशीरापर्यंत प्रलंबित होते.
हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ
महिनानिहाय बरे झालेल्या रूग्णांची संख्या अशी-
३० जूनपर्यंत-----------२ हजार ३४०
जुलै------------------८ हजार ७८७
ऑगस्ट---------------१८ हजार २९४
सप्टेंबर---------------३६ हजार ९७०
ऑक्टोबर-------------२१ हजार ६१५
नोव्हेंबर--------------८ हजार ५५०
डिसेंबर (१४ पर्यंत)----३ हजार ६८२