
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गुजरातमधून चोरलेली इको कार नाशिकमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ताब्यात घेतले आहे. आडगाव जकात नाका परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संशयितांकडून कारसह तीन मोबाइल असा दोन लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पिंकल श्रवण पाडवी (22), जसवंत रमेश वसावा (22), रुस्तम नगीनभाई वसावा (20, तिघे रा. जि. नर्मदा, गुजरात) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार संशयित मोहन वसावा हा पसार झाला आहे. गुजरातमधील काही चोरटे इको कार विक्रीसाठी शहरात येणार असल्याची माहिती हवालदार गुलाब सोनार यांना मिळाली होती.
पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाब सोनार, राजेंद्र घुमरे, शंकर काळे यांनी जकात नाका परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वाहनाची कागदपत्रे मिळाली नाहीत. उमरपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नसारपूर गावातून हे वाहन चोरल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. उमरपाडा पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा :
- नाशिक : कंपनीने जलवाहिनी फोडली म्हणून शेतकर्याचा विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न
- पुणे : पिस्तूल तस्करांचा शहरात वावर वाढला; आठ गावठी पिस्तुले, 23 काडतुसे जप्त
- पुणे : सदनिकाधारकाची तक्रार ‘महारेरा’ने फेटाळली; बिल्डरला दिलासा
The post Crime : गुजरातमधून चोरलेली कार नाशिकमध्ये आणली विकायला, तिघांना घेतले ताब्यात appeared first on पुढारी.