Crime News : नाशकात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; भाजीवालीच्या सतर्कतेमुळे सात जणांना अटक

नाशिक : कोरोना काळात हातचा रोजगार गेला आणि बेरोजगारीचं संकट ओढावलं. मग आता पोटापाण्यासाठी काय करायचं म्हणून एका गँगने चक्क नोटा छापण्याचा छापखानाच सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस. नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत बनावट नोटा  छापणाऱ्या 7 जणांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. किती बनावट नोटा चलनात आणल्या याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा छापायच्या आणि त्या सुरगणासारख्या  ग्रामीण भागात भोळ्या भाबड्या आदिवासींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत खरेदी विक्रीच्या  व्यवहाराच्या माध्यमातून चलनात आणायच्या अशी या टोळीची कार्यपद्धती होती. मागील आठवड्यात उंबरठाण गावात भाजीविक्रेत्या महिलेला भाजीच्या बदल्यात 100 रूपाची बनावट नोट दिल्याचे लक्षात आले. स्थानिकांनी 3 जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर निफाड तालुक्यातील विंचुर गावात  किरण गिरमेच्या प्रेसमध्ये नोटा छापत असल्याचे उघडकीस आले. लॉकडाऊनमध्ये रोजगार गेल्यानं हाताला काम नव्हतं. त्यामुळे नोटा छापण्याचा उद्योग सुरू केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे.

या आधीही बनावट नोटा छापून महाराष्ट्र गुजरात सीमेवर चलनात आणणाऱ्या  रॅकेटचा गुजरात पोलिसांनी पर्दाफाश केला होता. आता मात्र नाशिक जिल्ह्याच्या सुरगणा, चांदवड, येवला, निफाड या तालुक्यातून संशयिताना अटक करण्यात आल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेलाच धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच पोलीसही पाळंमुळं खोदू लागलेत.

पोलिसांनी अटक केलेल्या 7 जणांकडून 6 लाख 18 हजार 200 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेत नोटा छापण्यासाठी लागणरे संगणक, प्रिंटर स्कँनर, झेरॉक्स मशीन, मोबाईल चारचाकी वाहन जप्त करण्यात आलंय. तिघांना न्यालायायीन कोठडी तर उर्वरित आरोपींना पोलीस कोठडी सुनवण्यात आलीय. त्यामुळे बनावट नोटा छापून कुठे कुठे वितरीत केल्या जात होत्या? किती नोटा चलनात आणल्या आहेत,? रॅकेटमध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का? या दिशेने तपास सुरू आहे.