Dhule : पिंपळनेर पोलिसांनी रोखली गोवंशाची तस्करी

पिंपळनेर,www.pudhari.news

धुळे, (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा 

पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे व त्यांच्या पथकाने गोवंश तस्करी रोखली असून 19 गोवंशला जीवनदान देण्यात यश आले आहे. या प्रकरणात 12 लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळनेर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास पिंपळनेर ते सटाणा रोडवर शेलबारी घाटात वळण रस्ता असलेल्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांनी आयशरचा (डी क्र.एम.एच.१८ ए.ए.०८४८) चा पाठलाग केला व वाहन पकडले. या वाहनात 19 गोवंश जनावरे आढळून आली. त्यांची अंदाजे किंमत 2 लाख 91 हजार रुपये इतकी असून ताब्यात घेतलेल्या वाहनाची किंमत अंदाजे 10 लाख रुपये इतकी आहे. या कारवाईत असा एकुण 12 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला..

पोलीस कॉन्स्टेबल पंकज दत्तात्रय वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ड्रायव्हर एकलाक अजिज शेख (वय ४५ वर्षे)  रा. इस्लामपुरा, नवापुर, जि. नंदुरबार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज  वाघ, व्ही. आर. बहिरम, अशोक.एस.पवार, एन.आर.परदेशी  राकेश बोरसे, नरेंद्र परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

The post Dhule : पिंपळनेर पोलिसांनी रोखली गोवंशाची तस्करी appeared first on पुढारी.