Dhule : राज्यपाल कोश्यारी, त्रिवेदी यांच्याविरोधात काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे आज धुळे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.  यावेळी शहर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी कोश्यारी व त्रिवेदी या दोघांचा निषेध  केला.

महाराष्ट्रातील महापुरूषांविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वारंवार आक्षेपार्ह आणि अवमानकारक वक्तव्य करुन महापुरूषांचा अपमान करीत असतात. दरम्यान नुकतेच भगसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल अवमान करणारे वक्तव्य करुन महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचा रोष व्यक्त करीत धुळे शहर काँग्रेसच्यावतीने आज जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

धुळे शहरातील श्रीराम पेट्रोल पंपाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.अनिल भामरे, जिल्हा काँग्रेसचे सचिव डॉ.दरबारसिंग गिरासे, महीला अध्यक्ष गायत्री जयस्वाल, काँग्रेस नेते प्रा.जसपाल सिसोदिया, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, आनंद जावडेकर, सुरेश बैसाणे, दिपक पाटील, राजेंद्र खैरनार, निलेश पाटील, अशोक ससाणे, जावेद देशमुख, हाशीम अन्सारी, अ‍ॅड.सुधीर जाधव, रजिया सुलताना, भटू महाले, बानुबाई शिरसाठ, भगवान कालेवार आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Dhule : राज्यपाल कोश्यारी, त्रिवेदी यांच्याविरोधात काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.