Dhule : धुऴे जिल्हा भाजपा शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा

साक्री नगर पंचायतीमध्ये जनतेने सत्तांतर करून भारतीय जनता पक्षाकडे सत्ता दिली. यानंतर प्रथमच जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन साक्री शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामासंदर्भात शिष्टमंडळाला आश्वासित केले आहे. साक्री शहराच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी शहरातील विकास कामां संदर्भातील प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

साक्री नगरपंचायतच्या नगरसेवकांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. साक्री नगरपंचायतीच्या विकास कामासंदर्भात चर्चा केली.  यावेळी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी दहिते, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वाखाली ही भेट झाली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. तब्बल 40 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाची सत्ता साक्री नगरपंचायत वर आल्यानंतर नगरसेवकांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते यांच्या हस्ते करण्यात आला. प्रथमच भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर साक्री शहराच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी शहरातील विकास कामां संदर्भातील प्रस्ताव त्वरित सादर करण्याची सूचना मंत्री फडणवीस यांनी केली.

शहराला भेडसावणाऱ्या पाणी प्रश्ना संदर्भात आ. अमरीशभाई पटेल यांनी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अक्कलपाडा धरणातून पाणीपुरवठा योजना मंजूर केल्यास शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सुटू शकतो असे सांगितले. यावर यासाठी त्वरित दखल घेऊन योजना मंजुरीचे आश्वासन यावेळेस त्यांनी दिले. शहरांमधील विविध विकासकामांसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी शहरात सर्वात भीषण प्रश्न असलेल्या भूमिगत गटारीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या भेटी प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, शेतकी संघाचे चेअरमन विलासराव बिरारीस, हेमंत पवार, उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, बांधकाम सभापती एड गजेंद्र भोसले, आबा सोनवणे, पंचायत समितीचे गटनेते उत्पल नांद्रे , जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे व सामोडे चे सरपंच दीपक भारुडे, महेंद्र देसले, नगरसेवक प्रवीण निकुंभ, दीपक वाघ, विजय भोसले, जगदीश शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Dhule : धुऴे जिल्हा भाजपा शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट, केली 'ही' मागणी appeared first on पुढारी.