Site icon

Dhule : माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीसाठी रॅलीतून स्वच्छतेचा संदेश

धुळे : पुढारी वृत्तसेवा

स्वास्थ्य आणि आरोग्य जीवनशैलीतील महत्वपूर्ण बाबी असून त्यासाठी योगदान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हा संदेश घेवून प्लॉगिंग रेसचे आयोजन केले असून स्वच्छतेची चळवळ पुढे नेण्यासाठी सर्व नागरीकांनी यात सहभागी व्हावे. नुतन वर्षांत धुळे महानगरपालिकेस अव्वल मानांकन प्राप्त करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन मनपा उपायुक्त विजय सनेर यांनी केले.

धुळे महानगरपालिकेमार्फत माझी वंसुधरा अभियान टप्पा क्रमांक ३ मध्ये जनजागृती व प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने आज प्लाँगिंग रेसचे आयोजन आयुक्त देविदास टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.  माझी वंसुधरा उपक्रमामध्ये तरूण पिढीचा समावेश करून नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले. मालेगाव रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून प्रथम अभिवादन करण्यात आले. उपायुक्त विजय सनेर यांनी हिरवा झेंडा फडकवून रॅलीस प्रांरभ केला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा गांधी पुतळा या मार्गांत असलेला संपूर्ण कचरा रॅलीत सहभागी युवक-युवती, अधिकारी- कर्मचारी यांनी संकलित केला. स्वच्छतेच्या घोषणा देत धावत निघालेली रॅली पाहून नागरीकही यात स्वंयस्फुर्तीने सहभागी झाले.

महात्मा गांधींच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वच्छतेच्या अग्रदुत असलेल्या राष्ट्रपित्यांना साक्षी ठेवत स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. शहरात प्रातसमयी निघालेल्या या रॅलीने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले.

या रॅलीत धुळे प्लॉगर्स ग्रुपचे स्वंयसेवक प्रसाद आहिरराव, आदित्य मोरे, जाई पाटील, रोहित अहिरराव, हिमांशू राठोड, अभिषेक जैन, कार्तिक भदाणे, साहिल वाघ, दिशा सोनवणे, सिध्देश नाशिककर व गुप्रचे सदस्य उपस्थिती होते. या प्रंसगी आरोग्याधिकारी डॉ.एम.आर.शेख, नगरसचिव मनोज वाघ, डॉ. जे. सी. पाटील, कार्यालयीन प्रमुख राजेंद्र माईनकर, आस्थापना प्रमुख संजय मोरे मुख्य स्वच्छता निरिक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख चंद्रकांत जाधव, कनिष्ठ अभियंता प्रदीप चव्हाण, रविकिरण पाटकरी, अनिल साळुंखे, ऑल इडिया इन्स्टिट्यूटचे प्रोग्राम मॅनेजर सुप्रिया निकुंम, रोहित हिवरकर, जुनेद शेख तसेच सर्व स्वच्छता निरिक्षक, नर्सिंग स्टॉफ व कर्मचारी तसेच नागरीक उपस्थिती होते.

हेही वाचा :

The post Dhule : माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीसाठी रॅलीतून स्वच्छतेचा संदेश appeared first on पुढारी.

Exit mobile version