Dhule Accident : दहिवेल नजीक ट्रकची दुचाकीला धडक, तरुण ठार

पिंपळनेर:(ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा; सुरत महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण जागीच ठार झाला तर एकजण जखमी झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील दहीवेल गावाजवळ झाला. सौरभ ज्ञानेश्वर देवरे (वय19,रा. चिचवे, ता.मालेगाव,ह.मु. धाडणे ता.साक्री)असे मयताचे नाव आहे.

सौरभ देवरे हा त्याचा मित्र कुणाल अहिरराव याच्यासोबत दुचाकीने (क्र.एमएच18-एएस2522) दहीवेल येथे आला होता. काम आटोपून तो साक्रीकडे परत जात होता. त्याचवेळी उड्डाणपुलाच्या बोगद्यातून बाहेर पडत असताना त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या ट्रकने (क्र. जीजे17एक्स एक्स 9899) जोरदार धडक दिली. या अपघातात सौरभ देवरेचा जागीच मृत्यू झाला. तर कुणाल अहिरराव(वय22)हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी साक्री पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून उड्डाणपुल आणि रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. जर हे काम आधीच झाले असते. तर उड्डाण पुलावरुन ट्रक आणि जड वाहने गेली असती. आजचा अपघात टळला असता. त्यामुळे या कामाच्या ठेकेदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

The post Dhule Accident : दहिवेल नजीक ट्रकची दुचाकीला धडक, तरुण ठार appeared first on पुढारी.