
धुळे : पुढारी वृत्तसेवा
बनावट दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गजाआड केले असून त्यांच्याकडून वाहनासह दोन लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
साक्री शहरात बनावट देशी दारूची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत तसेच संजय पाटील, रफिक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाने, संदीप सरग, योगेश चव्हाण, राहुल सानप, तुषार पारधी, मयूर पाटील यांच्या पथकाला कारवाई करण्यासाठी पाठवले.
यावेळी साक्री पिंपळनेर रस्त्यावर एम एच 01 सी जे 0556 या क्रमांकाची इंडिको गाडी साक्री शहरात दाखल होत असताना दिसून आली. या पथकाने गाडी थांबवून चौकशी केली असता या गाडीमध्ये साक्री येथे राहणारे श्रीराम मोतीराम बाबर हा हॉटेल व्यवसायिक तसेच विकास उर्फ कालचरण गौड हे दोघे आढळून आले. गाडीमधून 63 हजार 840 रुपये किमतीचे टॅंगो पंच देशी दारूचे बॉक्स तसेच प्रिन्स संत्रा देशी दारूचे बॉक्स आढळून आले. अधिक चौकशी केली असता या मद्य साठ्याचे कोणतेही अधिकृत कागदपत्र ताब्यात घेतलेल्या दोघांकडे आढळून न आल्याने त्यांना साक्री पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा साठा पुरवणारा व्यक्ती आणि साक्री येथे बनावट मद्याची विल्हेवाट लावणाऱ्या म्होरक्याला शोधण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
हेही वाचा :
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडल्याने समाजात दुफळी : उदयनराजे भोसले
- Stunts for Reel : रील बनवण्याच्या व्यसनाने घेतला तरुणीसह दोन युवकांचा बळी
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडल्याने समाजात दुफळी : उदयनराजे भोसले
The post Dhule Crime : साक्रीत बनावट मद्यसाठा जप्त, दोघांना अटक appeared first on पुढारी.