Dhule Crime : रागाने बेभान झालेल्या पतीने धारधार शस्राने केली पत्नीची हत्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा

किरकोळ कारणावरून पत्नीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची घटना साक्री तालुक्यातील पेरेजपूर गावात घडली आहे. या प्रकरणात साक्री पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्री तालुक्यातील पेरेजपूर येथील वामन गमा मोरे यांच्या शेतात ही घटना घडली. अष्टाने येथे राहणारे राजेंद्र सोनवणे आणि त्यांची पत्नी मीनाबाई सोनवणे यांच्यात नेहमी वादविवाद होत होते. मात्र या वादाची परिमिती खुनात झाली आहे. राजेंद्र सोनवणे हे रागाने बेभान झाल्यानंतर त्यांनी मिनाबाई यांच्या डोक्यात वार केला. हा वार वर्मी बसल्याने मिनाबाई शेतातच कोसळल्या. या घटनेनंतर राजेंद्र सोनवणे यांनी घटनास्थळावरून पलायन केले.

मात्र ग्रामस्थांनी ही माहिती दिल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे आणि पोलीस निरीक्षक अजयकुमार चव्हाण तसेच उपनिरीक्षक नऱ्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात बंडू शंकर निकम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साक्री पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post Dhule Crime : रागाने बेभान झालेल्या पतीने धारधार शस्राने केली पत्नीची हत्या appeared first on पुढारी.