Dhule Gram Panchayat : धुळे जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात

धुळे मतमोजणीला सुरुवात,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यातील 118 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजेपासून सुरुवात झाली आहे. मतमोजणीचा कल ऐकण्यासाठी तांत्रिक विद्यालयाच्या बाहेर जेल रोडवर मोठ्या प्रमाणावर समर्थकांनी गर्दी केली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. यातील 14 गावातील सरपंच आणि 400 सदस्य बिनविरोध झाल्यामुळे 118 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात सरपंच पदासाठी 366 तर सदस्य पदासाठी 1796 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात दोन लाख 64 हजार 727 मतदार होते. त्यापैकी 76.59 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. धुळे तालुक्यात 30, साक्री तालुक्यात 50, शिरपूर तालुक्यात 16 तर शिंदखेडा तालुक्यात 22 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. दरम्यान आज सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे.

The post Dhule Gram Panchayat : धुळे जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात appeared first on पुढारी.