Dhule News : पोलीस पाटील, कोतवाल पदाची भरती स्थगित

धुळे : पुढारी वृत्तसेवा ; धुळे जिल्ह्यातील सद्यस्थितीत सुरु असलेली अनुसूचित क्षेत्रातील (पेसा क्षेत्रातील) पोलीस पाटील व कोतवाल रिक्त पदे भरती प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. तर अनुसूचित क्षेत्राबाहेरील (पेसा क्षेत्राबाहेरील ) पोलीस पाटील व कोतवाल भरतीची पुढील प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार सुरु राहणार असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी नितीन गावंडे व उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद भामरे यांनी कळविले आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी गावंडे यांनी म्हटले आहे, धुळे जिल्ह्यातील धुळे व शिरपूर उपविभागातील कोतवाल व पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरतीसाठी 4 ऑक्टोंबर, 2023 पासून 15 ऑक्टोंबर, 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार धुळे जिल्ह्यात पोलीस पाटील, कोतवाल संवर्गातील रिक्तपदाची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पोलीस पाटील, कोतवाल पदासाठी 29 ऑक्टोंबर, 2023 रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या 13 ऑक्टोंबर, 2023  व महसुल व वनविभागाच्या 17 ऑक्टोंबर, 2023 च्यापत्रानुसार बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या 17 संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया,नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार पोलीस पाटील व कोतवाल हे पद देखील अनुसुचित क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गाच्या सूचीतील असल्याने धुळे जिल्ह्यातील सद्यस्थितीत सुरु असलेली फक्त अनुसुचित क्षेत्रातील (पेसा क्षेत्रातील ) पोलीस पाटील व कोतवाल रिक्त पदे भरती प्रक्रिया पुढील आदेशापावेतो स्थगित करण्यात येत आहे. अनुसूचित क्षेत्राबाहेरील ( पेसा क्षेत्राबाहेरील ) पोलीस पाटील व कोतवाल भरतीची पुढील प्रक्रिया नियेाजन वेळापत्रकानुसार सुरु राहणार आहे. असे अपर जिल्हादंडाधिकारी नितीन गावंडे यांनी कळविले आहे.

शिरपुर तालुका

शिरपूर उपविभागातील पोलीस पाटील संवर्गातील  पेसा क्षेत्रातील 16 गावे पुढील प्रमाणे  वडेल खु, भोईटी, बुडकी, चिलारे, काकडमाळ, गधडदेव, हेंद्रयापाडा, हिंगोणीपाडा, हिवरखेडा, फत्तेपूर (क), अभाणपूर खु, ममाणे, वरझडी, वासर्डी, हिसाळे, वाडी ब्रु. तर शिरपूर उपविभागातील कोतवाल संवर्गातील पेसा क्षेत्रातील 6 सजाची नावे पुढील प्रमाणे हिसाळे, बोराडी, कोडीद,सांगवी, खंबाळे, लौकी असे आहेत. त्यानुसार शिरपूर तालुक्यातील अनूसूचित क्षेत्र (पेसा ) अंतर्गत असलेल्या 16 गावांतील पोलीस पाटील व 6 संजाची कोतवाल रिक्त पदांची भरती प्रक्रिया पुढील आदेशापावेतो आहे त्या टप्याटीवर स्थगीत करण्यात येत आहे. अनुसूचित क्षेत्राबाहेरील ( पेसा क्षेत्राबाहेरील ) पोलीस पाटील व कोतवाल भरतीची पुढील प्रक्रिया नियेाजन वेळापत्रकानुसार सुरु राहणार आहे. असे उपविभागीय दंडाधिकारी प्रमोद भामरे यांनी कळविले आहे.

साक्री तालुका

साक्री  उपविभागातील पोलीस पाटील संवर्गातील  पेसा क्षेत्रातील 31 गावे पुढील प्रमाणे  कुडाशी, सितारामपूर, भोरटीपाडा, कुत्तरमारे, मोहाणे, करंझटी, चोरवड, वाकी, पारगावं,जामखेल, बुरुडखे, मापलगांव, लव्हारदाडी, मांजरी, टेंभे प्र.वार्सा, जांभोरे, मळगाव प्र.वार्सा, खांडबारा, झिरणीपाडा, उमरपाटा, सुतारे, काकर्दे, पोबारे, बोदगांव, धोंगडेदिगर,मैंदाणे, रुणमळी, जेबापूर, विरखेल, किरवाडे, जिरापूर तर साक्री उपविभागातील कोतवाल संवर्गातील पेसा क्षेत्रातील 2 सजाची नावे पुढील प्रमाणे कुत्तरखांब, डांगशिरवाडे असे आहेत.

हेही वाचा :

The post Dhule News : पोलीस पाटील, कोतवाल पदाची भरती स्थगित appeared first on पुढारी.