Dhule Pimpalner : वार्सा चौफुलीवर बिरसा मुंडा यांच्या पुतळयाचे भूमिपूजन

बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

धुळे, (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा 

तालुक्यातील नवापूर वार्सा रस्त्यावरील वार्सा गावालगतच्या चौफुलीवर आदिवासी समाजाचे दैवत समजले जाणारे बिरसा मुंडा यांच्या पुतळयाचे भूमिपूजन करण्यात आले. सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अशोक आर. सोनवणे व धीरज अहिरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

बिरसा मुंडा यांचे नाव वार्सा चौफुलीला देण्यात आले असून त्यांचा पुतळा बसविण्याचे काम लवकरच करण्यात येणार आहे. याप्रसंगी आदिवासी बांधवांनी ढोल पावरी पारंपारिक नृत्य व पारंपारिक वाद्याने या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला.

या कार्यक्रमात डोंगर बागुल, डॅनियल कुवर, शांताराम कुवर, धीरज अहिरे, रमेश गांगुर्डे, अण्णा पवार, किरण बागुल, धुडकू भारुड, ईश्वर मालचे डॅनियल वळवी आदी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post Dhule Pimpalner : वार्सा चौफुलीवर बिरसा मुंडा यांच्या पुतळयाचे भूमिपूजन appeared first on पुढारी.