Dhule Sakri : चिकसे सरपंचपदी माळीच तर उपसरपंचपदी खैरनार बिनविरोध

धुळे, पिंपळनेर पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील चिकसे-जिरापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक बिनविरोध झाली. नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी भाऊसाहेब माळीच व उपसरपंच पदासाठी वंदना खैरनार यांचे प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी के एफ.शिंदे यांनी बिनविरोध निवड घोषित केली.

सदस्यपदी अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गातून भारती माळीच, सरस्वती सोनवणे व अंजना भारुड यांची सर्वसाधारण (महिला) प्रवर्गातून वंदना खैरनार व मनीषा खैरनार, अनुसूचित जमाती प्रवर्गातून भाऊसाहेब माळीच व दिनकर माळीच, अनुसूचित जाती प्रवर्गातून विलास डामरे तर सर्वसाधारण प्रवर्गातून गणेश बिरारीस या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी के.एफ.शिंदे, ग्रामसेवक जगदीश घुगे, तलाठी राहुल गुणवंते, कोतवाल प्रकाश चौरे, पिंपळनेर पोलिस स्टेशनचे दत्तू कोळी, श्रीमती एस.एस.सैंदाणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Dhule Sakri : चिकसे सरपंचपदी माळीच तर उपसरपंचपदी खैरनार बिनविरोध appeared first on पुढारी.