Dhule Sakri : महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी प्रतिभा सूर्यवंशी

प्रतिभा सुर्यवंशी,www.pudhari.news

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा 

महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी साक्री पंचायत समितीच्या माजी सभापती प्रतिभा पंकज सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामकांत सनेर, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा गायत्री जयस्वाल यांच्याहस्ते प्रतिभा सूर्यवंशी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी माजी खा.बापुसाहेब चौरे, माजी आ. डी.एस.अहिरे, शिक्षक पदवीधर मतदार संघाचे आ.डॉ.सुधीर तांबे, साक्री तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, साक्री तालुका कार्याध्यक्ष दिपक साळूंखे, साक्री पंचायत समितीचे सभापती शांताराम कुवर, पं.स.सदस्य रमेश गांगुर्डे, प्रवीण चौरे, पंकज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Dhule Sakri : महिला काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी प्रतिभा सूर्यवंशी appeared first on पुढारी.