Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जलपूजन

धुळे (पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा 
साक्री तालुक्याचे भूषण व पिंपळनेरसह पश्चिम भागातील अमृत वाहिनी असलेले लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणाचे विधिवत जलपूजन करण्यात आले.

यावेळी सरपंच देविदास पवार, उपसरपंच विजय गांगुर्डे, पंचायत समितीचे मा. सभापती संजय ठाकरे, ग्रामविकास अधिकारी पवार, ग्रा. पं. सदस्य योगेश बधान, प्रमोद गांगुर्डे, पं. स. सदस्य देवेंद्र पाटील, मा. उपसरपंच योगेश नेरकर, देवेंद्र कोठावदे, गजेंद्र कोतकर, निलेश कोठावदे, शामकांत पगारे, अंबादास बेनुस्कर, सतिश पाटील, अमोल पाटील, नितीन कोतकर, रविंद्र कोतकर, विजय नंदन, दत्तु गुरव, प्रतिक कोतकर, बापू माळचे, रविंद्र भावसार आदी उपस्थित होते.

पश्चिम पट्ट्यातील शेंदवड मांजरी, कुडाशी, पिंपळपाडा या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पांझरा नदी ओसंडून वाहत आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपळनेर येथील लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा :

The post Dhule Sakri : लाटीपाडा धरण पूर्णक्षमतेने भरल्याने जलपूजन appeared first on पुढारी.