धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेतून आमदार जातील खासदार जातील पण तळागाळातले शिवसैनिक निष्ठेने शिवसेनेसोबतच राहतील. यापुढील काळात तालुक्यातील शिवसैनिकांनी जोमाने काम करण्याचे आवाहन विधानसभा संपर्कप्रमुख प्रसाद ढोमसे यांनी केले आहे.
शिवसेना साक्री आणि नियोजित पिंपळनेर तालुका विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख किशोर वाघ, साक्री तालुकाप्रमुख पंकज मराठे, पिंपळनेर तालुकाप्रमुख हेमंत साबळे, तालुका संघटक अमोल सोनवणे, पंचायत समिती सदस्य बाळू टाटिया, माउली देसले, महावीर जैन शिवसेना उपतालुकाप्रमुख कैलास ठाकरे, अमोल क्षीरसागर, अप्पा तुषार आदींसह शाखाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते. उपजिल्हाप्रमुख किशोर वाघ म्हणाले, साक्री पिंपळनेर तालुका शिवसेना शंभर टक्के माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे, यात काही शंका नाही. एक गेला तर शंभर शिवसैनिक तयार करू आणि येत्या विधानसभेला शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी आतापासून तयारीला लागू व तालुक्यात भगवा फडकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तालुकाप्रमुख पंकज मराठे यांनी शिवसेना साक्री तालुका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले.
हेही वाचा :
- शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही ‘उठाव’ केला : गुलाबराव पाटील
- पुणेरी वॉरियर्सला जेतेपद; पीडीएफए फुटबॉल लीगमध्ये फन फिटनेसचाही सहज विजय
- अमेरिकेत समुद्रामार्गे 25 दिवसांत पोहोचला भारतीय केशर आंबा, नाशिकच्या निर्यातदाराची कमाल
The post Dhule Sakri : शिवसैनिकांनो जोमाने काम करा : संपर्कप्रमुख ढोमसे यांचे आवाहन appeared first on पुढारी.